सह्याद्री | चौफेर न्यूज
वणी : रंगनाथ स्वामी नागरी सह.पतसंस्थेची निवडणूक सध्या शेवटच्या टप्प्यात आली आहे. त्यामुळे विरोधक पतसंस्थेच्या निवणुकीत आपली 'पत' वाढविण्यासाठी आरोपांची खैरात वाटत असल्याचे चित्र दिसून येत आहे.परंतु मागील कित्येक वर्षापासुन ॲड.देविदास काळे यांच्या कार्यकाळात पतसंस्थेने भरगोस उच्चांक गाठण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे विरोधकांनी केलेल्या आरोपात तथ्य नसून मतदारांकडून आता दुर्लक्षित करण्यात येत असून विरोधी परिवर्तनाची लाट ओसरली आहे.
विद्यमान अध्यक्ष यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत, पत संस्थेचे धोरण लक्षात घेऊन तळागळातील शहरी ग्रामीण सभासदांना त्यांच्या मिळकतीच्या योग्यतेनुसार कर्ज उपलब्ध करुन रंगनाथ स्वामी पतसंस्था जिल्ह्यात कर्ज वाटपात व कर्ज वसुलीत प्रथम क्रमांकावर राहिल्याने ॲड.काळे यांच्या नेतृत्वावर कित्येक वर्षापासुन सभासद संतुष्ट आहे हे सर्वश्रुत आहेत. त्यामुळेच संस्थेचा "ग्राफ" वाढत चाललेला आहे. बहुतांश ही बाब विरोधकांना खटकत असल्याने विरोधकांनी तथ्यहीन आरोप करण्यात धन्यतः मानत आहे.
श्री रंगनाथ स्वामी नागरी सह.पतसंस्थेचे निवडणूक वारे कायम जय सहकार च्या दिशेने वाहू लागल्याने विरोधकांची तगमग होऊ लागली आहे.
कामाची पावती पुन्हा एकदा देतील - जय सहकारचा विश्वास
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 25, 2022
Rating:
