सह्याद्री | चौफेर न्यूज
वणी : दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांचे महाराष्ट्र ट्रायबल आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष गीत घोष यांनी अभिनंदन केले आहे. तसेच या सर्वांना पुढील उज्ज्वल शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
"शिक्षण प्रवासातील एक टप्पा आपण यशस्वीपणे पार केला आहे, या यशासाठी आपले सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन! आता पुढील शैक्षणिक वाटचालीत करिअर म्हणून वेगवेगळी क्षेत्रं खुणावत असतील. शिक्षण मानवी जिवनात क्रांतिकारी आणि उज्वल बदल घडवून आणत असते. ते माणसाला अज्ञानातून बाहेर काढून डोळस बनवत असते. यामुळे आपले सामाजिक, आर्थिक स्वतंत्र आणि स्वावलंबी बनवीते. एकूण शिक्षण माणसाला स्वतंत्र व स्वयंपुर्ण माणूस बनवते.
उज्ज्वल यश मिळविण्यासाठी प्रयत्नपूर्वक आणि डोळसपणे पावले टाका. अभ्यासात मेहनतीची तयारी ठेवा, यश निश्चितच मिळेल. त्यासाठी हार्दिक शुभेच्छा!"असेही घोष शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
शिक्षण आयुष्याला यशाकडे घेउन जाणरे सुत्र आहे – गीत घोष
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
June 17, 2022
Rating:
