टॉप बातम्या

अध्यक्ष पदी योगेश पडोळे, उपाध्यक्ष पदी अरूण गोडे, सचिव पदी राहुल वऱ्हाडे यांची निवड


सह्याद्री न्यूज | रवि वल्लमवार 
केळापूर, (१२ ऑक्टो.) : दि. ५ ऑक्टोबर रोजी पत्रकार वेलफेअर असोसीएशन पांढरकवडा द्वारा संचालित केळापूर तालुका पत्रकार संघाची नविन कार्यकारिणी करीता बैठकीचे आयोजन स्थानिक विश्रामगृह येथे करण्यात आले होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी दिपक तावरे हे होते. यावेळी सर्वानुमते पत्रकार वेलफेअर असोसीएशन पांढरकवडा द्वारा संचालित केळापूर तालुका पत्रकार संघाची कार्यकारिणी बिनविरोध निवडण्यात आली.

यामध्ये अध्यक्षपदी योगेश पडोळे, उपाध्यक्ष पदी अरूण गोडे, सचिव पदी राहुल वऱ्हाडे, सहसचिव पदी राजेश बेतवार, कोषाध्यक्ष पदी सुबोध काळपांडे, सह कोषाध्यक्ष पदी रूपेश बाजोरीया, सल्लागार पदी दामोधर बाजोरीया, दिपक तावरे, अशोक बेले, संभा मडावी, सदस्य पदी ओमेश दर्शनवार, संजय औदार्य, रवि दर्शनवार सतिश पुल्लजवार, रफिक खान, संदिप बाजोरीया, सुधिर कोचे यांची निवड करण्यात आली आहे. केळापुर तालुका पत्रकार संघ तालुक्यातील ग्रामीण व शहरी विभागाच्या विविध समस्येला वाचा फोडण्यात सदैव अग्रेसर राहत असून सोबत विविध सामाजिक सेवाकार्य राबविण्याबाबत यावेळी 
पत्रकार वेलफेअर असोसीएशन द्वारा संचालित केळापूर तालुका पत्रकार संघाने संकल्प केला आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();