सह्याद्री न्यूज | किरण घाटे
बल्लारपूर, (२१ ऑक्टो.) : विद्यानगर वार्डातील सावित्रीबाई फुले चौक या परीसरात असलेल्या सुरेश काळे यांचा घरा समोरचा इलेक्ट्रीक पोल काही महीन्यापासून जिर्ण अवस्थेत गेला हाेता.
सध्या हवा व पाऊस जास्त प्रमाणात येत असल्यामुळे तो पोल अक्षरशः हालत हाेता, ताे केव्हा पडेल याचा नेम नव्हता. या पोल मुळे नागरीकांतही भीतीचे वातावरण निर्माण झाले हाेते.
सदरहु परिसरातील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते राकेश कांबळे यांना पोलची समस्या सांगितली,लगेच काबंळे यांनी MSEB यांच्याकडे तक्रार करुन तो पोल काढून त्या ठिकाणी नवीन पाेल लावण्यात यावा अशी मागणी केली.
मागणीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी नविन इलेकिट्रीक पाेल उभा झाला.
सामाजिक कार्यकर्ता राकेश कांबळेंच्या प्रयत्नाने बदलला इलेक्ट्रीक पोल
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 21, 2021
Rating:
