सह्याद्री न्यूज | नंदकुमार मस्के
महागांव, (२९ ऑगस्ट) : आता नगरपंचायत व जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळच येऊन ठेपलेल्या आहे. त्या निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीने जोमात तयारी करून शहरातील विश्रामगृह येथे येणाऱ्या नगरपंचायत निवडणुकीचे संदर्भात महिला आघाडी चे वतीने नुकतीच बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये यवतमाळ पश्चिम विभागाचे जिल्हाध्यक्ष मा. धनंजय गायकवाड यांनी पक्ष संघटन मजबूत करून गाव तेथे शाखा निर्माण करण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच महागाव नगरपंचायत पूर्णपणे ताकत लावून एकजुटीने लढण्याचे आवाहन करण्यात आले.
येणाऱ्या निवडणुका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढण्याचे आदेश जिल्हाध्यक्ष धनंजय गायकवाड यांनी तालुक्यातील पदाधिकारी यांना दिला तसेच त्यादृष्टीने तयारी करण्याचा सुचना दिल्या, यावेळी धम्मावती वासनिकताई महिला आघाडी जिल्हाध्यक्ष यवतमाळ आणि करूनाताई चौधरी यांनीही महिलांना मार्गदर्शन केले.
या बैठकीत प्रकाश डांगे, दिलीप काळबांडे, शे. महेबूब, शे. अहमद शेख हारून, जल्लाउद्दिन काझी यांनी पक्ष प्रवेश केला. धनंजय गायकवाड यांनी त्यांचे स्वागत केले. सौ. वंदनाताई भवरे, तालुकाध्यक्ष शे. अश्फाक शे. आगा, शहराध्यक्ष पप्पूभाऊ कावळे यांनी या बैठकीचे आयोजन केले.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन तालुका सल्लागार रामराव कांबळे, प्रास्ताविक विजय लहाने माजी जिल्हाध्यक्ष व आभार पप्पूभाऊ कावळे यांनी मानले. सौ. शोभाताई कावळे, शकुंतलाबाई वंजारे, गयाबाई सांगडे, बेबीबाई बहाद्दूरे, श्याम कांबळे, सचिव नामदेव लहाने, श्रीराम पवार इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.