सह्याद्री न्यूज नेटवर्क |
किनवट, (९ जुलै) : राजकारण हा माझा व्यवसाय नाही. मी सामाजिक बांधीलकीतुन समाजाचे उत्तरदायित्व, ऋण फेडण्याच काम संपूर्ण समाज घटकाचा किनवट-माहुर मतदार संघातील लोकप्रतिनिधी म्हणून मी शक्य तितके विकास कामे,अत्यावश्यक सोई सुविधा दुर्गम अति डोंगराळ भागातील सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी अविरत प्रयत्न करत असून, याही पलीकडे विरोधी बाकावर बसून देखील माझ्या मतदार संघाचा विकास साध्य करून घेण्यासाठी माझी इच्छा शक्ती दांडगी असून ‘मी जनतेचा आणि जनता माझी' या एकसूत्री कार्यक्रमानुसार विकासाचा गळा कायम राखणे साठी मी कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार भीमराव केराम यांनी पावसाळी अधिवेशनावरून परतल्यानंतर पत्रकारांशी वार्तालाप करताना दिली.
मागील एक ते दिड वर्षा पासून कोरोना विषाणुच्या प्रादुर्भाव असल्याने शासनाच्या नियम व जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने मला मतदार संघात संपर्क अथवा दौरा करता आला नाही. ही दुर्देवी बाब असल्याची मला खंत वाटते. काम करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती असलेल्या कुठल्याही लोकप्रतिनिधीला ही वेळ येऊ नये,कोरोना मुळे पाय थांबले...परंतु माझ्या मतदारसंघातील विकास कामाचा वाढता आलेख थांबलेला नाही. असे प्रतिपादन आमदार भीमराव केराम यांनी किनवट नगरीत आगमना नंतर पुढे बोलताना आमदार केला म्हणाले की,जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या रुग्णवाहिकेचे पासून तर औषध गोळ्यापर्यंत आपण कटाक्षाने लक्ष देऊन अशा स्वरूपाच्या सोयी प्रत्येक गावात उपलब्ध व्हावी यादृष्टीने विशेष प्रयत्न केले गेले व साक्षात तशा सोयी उपलब्धही झाल्या आहेत. दरम्यान च्या काळात दळणवळणाच्या दृष्टीने रस्ते विकास, प्रत्येक गावात मुबलक आणि शुद्ध पाण्याची कायम व्यवस्था व्हावी यासाठी पाठपुरावा करून कामे मंजूर केली.
शेतकरी आर्थिक दृष्ट्या सुजलाम-सुफलाम होऊन त्यांचा शेती व्यवसायातून आर्थिक स्तर उंचावण्यासाठी जलसिंचन कामे, मतदार संघातील बहुसंख्य बेरोजगार युवक असून त्यांना रोजगार निर्मित करण्यासाठी मतदार संघात नवे प्रकल्प उभारणी करण्याच्या दृष्टिकोनातून येथील सुशिक्षित बेरोजगार युवकांना शासन सेवेत समावेश व्हावा यासाठी मतदारसंघात पेसा अंतर्गत नोकरभर्ती व्हावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, महामहिम राज्यपाल यांचेकडे मी मागणी केली असून, त्याचा पाठपुरावा करीत आहे. मी जे करतो ते माझे कर्तव्य आहे. जनतेचा विश्वास आहे. प्रसिद्धि अथवा सत्तेसाठी नसल्याचे आमदार केराम यांनी सांगितले.
कोरोनामुळे पाय थांबले....परंतु आमदार म्हणून कमी पडलो नाही...
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 09, 2021
Rating:
