सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (७ जुलै) : भरधाव ट्रक रस्त्यालगतच्या हॉटेलमध्ये घुसल्याची घटना आज ७ जुलैला रात्री ८.३० वाजताच्या सुमारास चारगाव चौकी येथे घडली. कोळसा वाहतूक करणारा भरधाव ट्रक ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने चारगाव चौकी येथील आजाद हॉटेलमध्ये घुसला. या अपघातात ड्रायव्हरला कुठलीही दुखापत झाली नसून हॉटेलचे मात्र नुकसान झाले आहे. वणी वरून पैनगंगा खदानीत कोळसा भरण्याकरिता जाणारा पंजाब ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने चारगाव चौकी येथील रस्त्यालगत असलेल्या आझाद हॉटेलमध्ये घुसला. पैनगंगा खदाणीतून वरोरा एमआयडीसी परिसरातील वर्धा पॉवर प्लांट कंपनीमध्ये कोळशाची वाहतूक सुरु आहे. पंजाब ट्रान्सपोर्ट कंपनीला कोळसा वाहतुकीचे कंत्राट मिळाले आहे. या कंपनीचा MH ४० DC २१८० हा ट्रक वर्धा पॉवर प्लांट करिता कोळसा भरण्यास जात असतांना ट्रक चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटून ट्रक सरळ रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने असलेल्या हॉटेलमध्ये घुसला. पैनगंगा कोळसा खाणीतून वर्धा पॉवर प्लांट अशी कोळशाची वाहतूक सुरु असतांना ट्रक विरुद्ध दिशेने असलेल्या हॉटेलमध्ये कसा काय घुसला ही एकच चर्चा घटना स्थळावर ऐकायला मिळत होती. शिरपूर आबई फाटा मार्गे पैनगंगा हा ट्रकचा मार्ग आहे. पण ट्रक घुग्गुस मार्गावरील आझाद हॉटेलकडे कसा काय गेला याचेच नवल वाटते. या अपघातात ट्रक चालक किशोर पिंपळशेंडे याला कुठलीही दुखापत झाली नसून हॉटेलचे मात्र नुकसान झाले आहे.
पुढील तपास पोलिस करीत आहे.