मारेगाव येथे तालुका क्रिडा संकुलन उभारणीसाठी जागेची पाहणी


सह्याद्री न्यूज | दिलदार शेख 
मारेगाव, (१५ जुलै) : मारेगाव तालुका हा यवतमाळ जिल्ह्यातील अतिशय दुर्गम सेन्सेटिव्ह तालुका असून, मारेगाव शहरात व खेड्या पाड्यातील युवक,युवतीना  सुप्त गुणांना किंबहुना खेळण्यासाठी क्रिडांगण (ग्राउंड ) नसल्यामुळे तालुक्यातील क्रिडाक्षेत्रातील खेळाडूची निराशा होत होती व क्रिडा प्रेमींना व खेळाडूंना तालुक्याला 'क्रिडांगण' केव्हा मिळेल अशी आस लागून असतानाच मा.आमदार संजीवरेड्डी बोदकुलवार यांचा प्रयत्नामुळे व जिल्हाधिकारी साहेबाच्या निर्देशानुसार आज दिनांक १५ जुलै २०२१ रोजी मारेगाव तालुका क्रिडा संकुल समितीची मारेगाव, येथे सभा मा. आमदार संजीव रेड्डी बोदकुलवार,अध्यक्ष तालुका क्रीडा संकुल समिती मारेगाव याच्या अध्येक्षतेखाली सार्वजनिक बांधकाम विभाग मारेगाव येथील शासकीय विश्राम गृह येथे क्रीडा संकुल जागे विषयी चर्चा करून सदर जागेची पाहणी करण्यात आली. क्रीडा संकुलसाठी ती जागा घोन्सा रोड लगत असून टाकळखेळा शिवारातील ई क्लास ची, ४ हेक्टर एवढी जागा आहे. ही जागा पुरेपूर व योग्य असल्यामुळे, महसूल विभागाच्या साहाय्याने ही जागा क्रिडा संकुलसाठी उपलब्ध होणार आहे.

यावेळी मा. दिगंबर गौरकर नायब तहसीलदार मारेगाव, मा. उपरवार साहेब जिल्हा क्रिडा अधिकारी यवतमाळ, मा. तालुका क्रिडा अधिकारी मिलमिले साहेब, मा. आसुटकर साहेब उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मारेगाव, मा. नाल्हे साहेब गटविकास अधिकारी पं. स. मारेगाव, मा. चव्हाण साहेब नगरपंचायत मारेगाव, मा. जगदीश मंडलवार पोलीस निरीक्षक मारेगाव, मा. काकडे साहेब शा.शी. शिक्षक मारेगाव या सर्वांच्या उपस्थितीत टाकरखेडा येथील ई क्लासची जागा निश्चित करण्यात आली असून, या साठी येणारा शासनाचा पाच कोटीचा निधी क्रिडा संकुलनाला  लागणार असून, भव्यदिव्य सुंदर असे क्रिडांगण, संकुल मारेगाव तालुक्याला मिळणार आहे.

"युवकांमध्ये क्रिडा विषयांबाबत विशेष आकर्षण असते. मा. आ. बोदकुरवार यांच्या प्रयत्नाने मारेगाव येथे क्रिडा संकुलाची गरज आहे. हे लक्षात घेवून आता विकास आराखडा मध्ये तालुका क्रिडा संकुलासाठी ४ हेक्टर जागा सुनिश्चित झाली असून या जागेवर खेळाडूंसाठी तालूका क्रिडा संकुल उभारण्यात येईल. हे विशेष.."
Previous Post Next Post