सह्याद्री न्यूज | दिलदार शेख
मारेगाव, (१९ जुलै) : मारेगाव तालुक्यातील कोलगाव येथील महिलेचा वडगाव (रिठ) येथील आपल्या शेतात काम करीत असतांना पावसाचे वातावरण तयार झाले होते. त्याचवेळी अचानक कडाक्याची विज पडली. यामध्ये एक महिला व दोन कुत्रे ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज १९ जुलै ला पाच वाजताच्या सुमारास घडली आहे.
इंदू मारोती हिंगाने (४५) असे मृतक महिलेचे नाव असून, ती वडगाव शिवारात असलेल्या आपल्या शेतात आपल्या मोठया मुलासह काम करीत होती. अचानक ५:०० वाजता च्या सुमारास वीज पडली, त्यात इंदू ह्या ठार जागीच झाली. सुदैवाने त्यांचा मोठा मुलगा पाणी पिण्यास गेल्याने तो बचावला. मात्र,त्यांच्या शेजारी असलेल्या दोन कुत्र्याचा ही मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून, मृतक महिलेला मारेगाव ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी आणले असून, सदर घटनेने कोलगाव येथे शोककळा पसरली.
मारेगाव तालुक्यातील महिला व दोन कुत्र्याचा विजपडून मृत्यू
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
July 19, 2021
Rating:
