बालाजी सुवर्णकार | सह्याद्री चौफेर
लातूर : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनरावजी तायवडे साहेब यांच्या गेल्या दिड वर्षाच्या ओबीसी आरक्षणासाठी च्या लढ्याला अखेर आज यश मिळाले,आज मा.सर्वोच्य न्यायालयाने राज्यातील स्थानिक *स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीत ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय सुवर्णाक्षरात लिहिला जाईल राष्ट्रीय ओबीसी महासंघातील सर्व पदाधिकारी महाराष्ट्र राज्य ओबीसी विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात लढा उभा केला, वेळोवेळी मोर्चे काढून ओबीसी समाजात जनजागृती चे कार्य केले तसेच जिल्हाधिकारी साहेबांना वेळोवेळी निवेदने दिले. गल्लीपासून दिल्लीपर्यंत एक मोठा असा लढा राज्यातील सर्व ओबीसी बांधवांनी उभा केला त्याचेच फलित आज मा.सर्वोच्य न्यायालयाने अखेर ओबीसींचे राजकीय आरक्षण लागू करण्याचा निर्णय दिला.या निर्णयासंदर्भात आज लातूर शहर महानगरपालिका समोर महान समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले व भारतीय संविधानाचे जनक भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून, फटाके फोडून, जिल्ह्यातील सर्व ओबीसी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पेढे भरवून आनंद साजरा करण्यात आला, या वेळेस सुदर्शन बोराडे प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ , दिलीप पिनाट, सुदाम पांचाळ विश्वकर्मा विकास महामंडळ जिल्हाध्यक्ष लातूर अनंत पांचाळ विश्वकर्मीवंशी समाज संघटन जिल्हाध्यक्ष लातूर, भागवत पांचाळ जिल्हा उपाध्यक्ष, श्रीकांत मुद्दे वडर समाज जिल्हाध्यक्ष लातूर अजित निंबाळकर ओबीसी ब्रिगेड मराठवाडा अध्यक्ष , बारा बलुतेदार महासंघाचे मराठवाड्यचे अध्यक्ष भाऊसाहेब शेंद्रे, अनंत दिघे, शरद राठोड,सुरेश चव्हाण vjnt जिल्हाध्यक्ष लातूर, अशोक चव्हाण प्रदेश उपाध्यक्ष गोरसेना , कार्यकर्ते वैजनाथ कांबळे, अड. हरिकेश पांचाळ, बालाजी सुवर्णकार मोहन पोतदार ओबीसी एक परिषद जिल्हा अध्यक्ष लातूर, वेदपाठक साहेब दीक्षित साहेब .सर्व ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.