चेतन पवार | सह्याद्री चौफेर
दारव्हा : तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जेमतेम जमिनीच्या वर डोके काढलेल्या पिकाची नासाडी झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी महागाव येथील हेमंत आडे युवा नेते, ग्रा.पं.सदस्य किशोर काकस, ग्रा.पं.सदस्य वैभव दुधे, ग्रा.पं.सदस्य बंडू वगारे,ग्रा.पं.सदस्य खुशाल आडे,ग्रा.पं.सदस्य बनसिया राठोड,यांनी निवेदनातून केली आहे.
पहिलेच दुबार पेरणी चे संकट शेतकऱ्यांवर होते दुबार पेरणी करून सावरले असता लगेचच सततधार पावसामुळे लहान लहान पिके नष्ट होण्याचे मार्गावर आहे. तरी कृपया मौजा महागाव येथील शेतकऱ्यांची शेताची पिकाची पंचनामा तात्काळ करावी. व शेतकयांना सरसकट आर्थिक मदत करावी. सतत चालू असलेल्या अतिवृष्टी पावसामुळे लहान-लहान पीक नष्ट होत आहे. शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओढावले होते.शेतकरी कामाला लागले असता.
सतत धार होणाऱ्या अतिवृष्टी कसेबसे दुबार पेरणी करून पावसामुळे शेतातील लहान लहान पीक नष्ट होत आहेत. याकरिता शेतकरयांवर उपासमारीची वेळ आली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी. यांनी निवेदन सादर करून आर्थिक मदत देण्यात यावी करिता तहसीलदार साहेब यांना विनंती केली. सततधर पावसामुळे अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना पंचनामा करून त्यांना त्वरित मदत जाहीर करण्यात यावा. अशी मागणी निवेदनात नमूद केले आहे. त्यावेळी महागाव पं.स.सर्कल पदाधिकारी उपस्थित होते.