चेतन पवार | सह्याद्री चौफेर
दारव्हा : तालुक्यातील सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन शेतकऱ्यांवर फार मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान भरपाई देण्याची मागणी तालुका कॉंग्रेस च्या वतीने करण्यात आली आहे. त्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.
तालुक्यात ७-८ दिवसापासुन अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची शेती खरडुन गेली असुन व शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्यामुळे शेतातील पिके पिवळी पडून सडायला लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे फार आर्थिक नुकसान होणार आहे. त्यासाठी शासनाच्या माध्यमातून तात्काळ शेतकऱ्यांच्या शेतातील पंचनामे करून दारव्हा तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना त्वरीत सरसकट आर्थिक नुकसान भरपाई देण्यात देण्यात यावी. यासाठी उपविभागीय अधिकारी दारव्हा यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री म. राज्य यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी दारव्हा तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष प्रकाश नवरंगे, सै. फारुक सै. करीम, शिध्दार्थ गडपायले, अतुल राऊत, अशोकराव चिरडे, रामधन जाधव, गजाननराव बिबेकर, अजय ठाकरे,जावेदखॉ पठाण, उत्तमराव गोमासे,जगन पाटील, गुलाबराव राठोड,डॉ.दिलीप मिरासे,बाळकृष्ण भोयर, रामभाऊ ठाकरे, विजय गोकुळे, ज्ञानेश्वर खोडे, विजय पाचकोर, प्रमोद लोंढे, प्रविण जाधव, नरेश गुघाने,
जितेंद्र महल्ले, अनिल लोथे, मधुकरराव राठोड, राजु अवचट, विनोद कानकीरड, शिवनारायण जयस्वाल, बाबाराव राऊत, शंकरराव तुपकर, संदिप राठोड, पंडीत राठोड, किसनराव जठाळे, वसंतराव सवाई, संजय उघडे, अज्याबराव पवार, संतोष फुसांडे, शेखर चौधरी, बबलु येवले, रोशन नवरंगे, साहेबराव जवके, नरेश गुधाने, गजानन डेरे, अतुल कुटे, सागर कोटमकार, हरसिंग चव्हाण, भाऊराव आडे, वसंतराव बोरचाटे, गजाननराव माने, अमोल ठाकरे सह कॉंग्रेस पक्षाचे आजी, माजी पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.