टॉप बातम्या

कळंब: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार वेटे यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन


रुस्तम शेख | सह्याद्री चौफेर 

कळंब : सतत होणाऱ्या संततधार पावसामुळे कळंब तालुक्यातील शेतीचे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून आर्थिक हेक्टरी 50 हजार रुपये मदत तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, या करिता आज कळंब येथील प्रभारी तहसीलदार वेटे साहेब यांना निवेदन देण्यात आले.

गेल्या 2 दिवसापासून कळंब तालुक्यात पावसाने थैमान घातले आहे, तालुक्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान केलेले आहे, बऱ्याच जणांची राहती घरे पावसाने पडलेली असून मोठया प्रमाणात शेतकऱ्याच्या शेतजमिनी पाण्याखाली आलेल्या आहे. या आधी पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते, आणि आता दोन दिवसांच्या पावसाने तर सर्व सामान्य शेतकरी डबघाईस आलेला असून संसाराचा गाडा कसा चालवावा असा प्रश्न त्यांच्या समोर ठाण मांडून उभा आहे. या परस्थितीची दखल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांनी घ्यावी,व त्वरित पंचनामे करून शेतकरी व नागरिकांना थेट आर्थिक मदत देण्यात यावी असे निवेदन आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कळंब तालूका अध्यक्ष सुधाकर निखाडे, राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष मनीषा काटे (भोसले), राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस कळंब तालूका अध्यक्ष मनोज पिसे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस कळंब तालूका अध्यक्ष योगेश लिलारे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस जानराव भोयर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कळंब तालूका उपाध्यक्ष सुधाकर पवार, सामाजिक न्याय विभाग तालूका अध्यक्ष लक्ष्मणभाऊ ढाले, राष्ट्रवादी कळंब तालूका सचिव प्रशांत भोयर, अमित भोयर, अल्पसंख्याक अध्यक्ष मुनुअर अली सैय्यद, राष्ट्रवादी युवती काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष शुभांगी चांदोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालूका सरचिटणीस प्रमोद पाटील, गणपतराव थुल, आकाश काटे, नरेश दिगांबर आदी उपस्थित होते.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();