टॉप बातम्या

महिलेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीला जन्मठेप; वरोरा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वरोरा : महिलेला जबरदस्तीने गाडीत बसवून निर्जनस्थळी नेऊन लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात वरोरा येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेसह विविध कलमांनुसार कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात गुन्हा क्रमांक ३५३/२०२१ अंतर्गत वरोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

माननीय अतिरिक्त सत्र न्यायालय, वरोरा येथील न्यायाधीश श्री. अतुल के. शहा यांनी आरोपीस भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६(२)(एन) अंतर्गत जन्मठेप व ५ हजार रुपये दंड, कलम ३७६ अंतर्गत ७ वर्षे कारावास व ४ हजार रुपये दंड, कलम ३२३ अंतर्गत १ वर्ष कारावास व १ हजार रुपये दंड, तसेच कलम ५०६ अंतर्गत १ वर्ष कारावास व १ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.

या प्रकरणात तपास अधिकारी महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक विद्या जाधव, सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. गोविंद उराडे आणि पैरवी अधिकारी धनराज करकाडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक व अपर पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात आला.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();