टॉप बातम्या

चंद्रपूरमधील बेरोजगारांना अप्रेंटिसशिपच्या अधिक संधी उपलब्ध करण्याची शिवसेनेची मागणी

सह्याद्री चौफेर | किरण घाटे 

चंद्रपूर : जिल्ह्यातील स्थानिक बेरोजगार तरुण-तरुणींना अप्रेंटिसशिपच्या अधिक संधी मिळवून देण्यासाठी शिवसेना भारतीय कामगार सेनेच्या वतीने प्रशासनाकडे आग्रही मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून स्थानिक युवकांच्या रोजगाराचा आणि प्रशिक्षणाचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक आणि खाण क्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. जिल्ह्यात वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड (WCL), MIDC आणि इतर अनेक लघु व मोठे उद्योग कार्यरत आहेत. येथे ITI, डिप्लोमा, इंजिनिअरिंग तसेच पदवीधर झालेले हजारो तरुण रोजगाराच्या शोधात आहेत. केंद्र सरकारच्या NATS आणि NAPS या योजनांतर्गत युवकांना उद्योगांमध्ये प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण, कौशल्यविकास आणि विद्यावेतन (स्टायपेन्ड) मिळण्याची संधी उपलब्ध होते.

जिल्ह्यातील स्थानिक युवकांना WCL चे विविध क्षेत्र आणि इतर उद्योगांमध्ये अप्रेंटिसशिपच्या जास्तीत जास्त जागा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. तसेच युवकांना अर्ज प्रक्रिया आणि नोंदणीबाबत योग्य मार्गदर्शन करण्यासाठी तालुकास्तरावर विशेष शिबिरे आयोजित करावीत, अशी मागणीही शिवसेनेने केली आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();