टॉप बातम्या

वणीत धाड सत्र; अवैध मटका व्यवसायावर पोलिसांची कारवाई

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी वणी पोलिसांनी धाड सत्र राबवित कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. त्याच पार्श्वभूमीवर दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5.08 ते 5.30 वाजताच्या दरम्यान नगर परिषदजवळील गोयल गल्लीत सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या वरली मटका जुगारावर पोलिसांनी धाड टाकली.

या कारवाईत आरोपी अतुल सुधाकर नक्षीने (वय 39, रा. रंगारीपुरा, वणी) व शेख फारूख शेख सलीम (वय 36, रा. पंचशील वार्ड, वणी) यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपी लोकांच्या गर्दीत बसून नागरिकांकडून पैसे स्वीकारून वरली मटक्याचे आकडे लिहित असल्याचे निदर्शनास आले.

पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता आरोपींकडून एक पेन, कार्बन तुकडा, वरली मटक्याचे आकडे लिहलेले पट्टी बुक व नगदी 1,410 रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी फिर्यादी पोहेकों/2265 निलेश पंजाबराव कुंभेकर (वय 38, पोलीस स्टेशन वणी) यांच्या फिर्यादीवरून कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायदा सहकलम 49 बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोना/2363 विशाल राठोड हे करीत आहेत.

शहरातील अवैध धंद्यांचा नायनाट करण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या या धाड सत्रामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();