सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : मारेगाव तालुक्यातील मार्डी येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेले उपोषण अखेर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. उपोषणाचा तिसऱ्या दिवशी आज दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ९:३० वाजताच्या सुमारास उपोषणाची सांगता करण्यात आली.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आमदार संजय देरकर, तहसीलदार उत्तम निलावाड, जिल्हा प्रमुख संजय निखाडे, विधानसभा प्रमुख सुनील कातकडे, विधानसभा समन्वयक सुधीर थेरे, वणी तालुका प्रमुख संतोष कुचनकर, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप काकडे, नगराध्यक्ष डॉ. मनिष मस्की, उपजिल्हा संघटिका डीनमताई टोंगे, ठाणेदार श्याम वानखेडे, पोलीस उपनिरीक्षक विकी जाधव, महावितरणचे कार्यकारी अभियंता नरेंद्र कटारे (पांडरकवडा), उपअभियंता श्यामसुंदर कुर्रा (मारेगाव), जिल्हा परिषद अभियंता संजय शिंदे तसेच कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
अधिकाऱ्यांनी शेतकरी व उपोषणकर्त्यांशी संवाद साधून मागण्यांचा आढावा घेतला. शासनाला योग्य तो प्रस्ताव पाठविण्यात येईल त्यांनी स्पष्ट केले. शेवटी शेतकरी व उपोषणकर्त्यांच्या संमतीने उपोषणाची सांगता करण्यात आली.
उपोषणकर्ते पुरुषोत्तम बुटे, दिवाकर सातपुते, सचिन पचारे, शरद ताजने, विजय अवताडे यांनी दि. 22 सप्टेंबर 2025 रोजी बेमुदत उपोषण सुरु केले होते.