टॉप बातम्या

भ्रष्टाचार झाला असल्याची नरेंद्र चौधरी यांची तक्रार!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : जुन्याच असलेल्या रस्त्याला डबल सिमेंट काँक्रीट करून बिल काढण्याचा प्रकार मौजा दापोरा येथे झालेला असून या कामात सरपंच ग्रामपंचायत अधिकारी यांनी भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप गावातील नागरिक नरेंद्र विनायक चौधरी यांनी केलेला आहे. 

गट-ग्रामपंचायत असलेल्या दापोरा येथे रोजगार हमी योजने मधून स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आलेले होते. या रस्त्याला दोन-तीन वर्ष होत नाही तोच खनिज विकास निधी मधून हाच रस्ता दाखवून पुन्हा याच रस्त्याचे डबल सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले. या रस्त्याचे काम आधीच झालेले होते.अशी संबंधिताकडे नरेंद्र चौधरी यांनी केली.
Previous Post Next Post