टॉप बातम्या

32 वर्षानंतर बारावीच्या वर्गमित्रांचे स्नेहमीलन

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : १९९२-९३ ला बारावीत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा ३२ वर्षानंतर एकत्र येत स्नेहमीलनाचा कार्यक्रम १५ फेब्रुवारी ला मारेगाव तालुक्यातील पांढरदेवी येथे पार पडला. विशेष म्हणजे या स्नेहमीलन कार्यक्रमकरिता अमेरिकेत वास्तव्य करणारी रोजीना अडतीया हिने उपस्थिती दर्शविली. 1992-93 ला मारेगाव येथील कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या या वर्गमित्रांची 32 वर्षानंतर भेट होत असल्याने सर्वांनी आपला जीवन परिचय देत विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. या स्नेहमीलन कार्यक्रमात रोजीना अडतीया (विराणी ), इंदू येरगुडे (मत्ते ), प्रेमलता चिकटे (थुल ), संगीता पुनवटकर (हस्ते), मेघा महाजन (डेहनीकर ), सुमित्रा तोडसाम (जुमनाके ), गीता आवारी, कल्पना झाडे (पारखी), वर्षा निमसटकर (मेश्राम ) तसेच बद्रीप्रसाद दुपारे, शरद खापणे, सुरेश नाखले, संतोष आस्वले, विजय बोबडे, गजानन आस्वले, प्रकाश बावणे, राजकुमार पाटील, मोरेश्वर काकडे, सहभागी झाले होते.
Previous Post Next Post