पोलीस प्रशासनाच्या अमलबजावणीमुळे शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : शासनाच्या वतीने शिवजयंती निमीत्त दारु दुकाने बंद करणेबाबत कुठलाही अध्यादेश जाहीर केलेला नाही. मात्र,  शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधुन मारेगाव तालुक्यात दारु दुकाने बंद ठेवण्या बाबतची पोलीस प्रशासनाच्या वतीने अमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. स्थानिक अनुज्ञप्ती धारकांना कुठलीही पुर्वसुचना न देता दारु दुकान बंद ठेवण्याचे अलिखीत फतवा काढण्यात आला होता. या अलिखीत आदेशामुळे अनुज्ञप्ती धारकांनी नेहमीप्रमाणे दिनांक 19 फेब्रुवारी सकाळी 8 वाजता दारुची दुकाने सुरु केली होती. मात्र, शिवजयंती निमीत्त दारुची दुकाने बंदचा आदेश असल्याची अफवा सकाळपासुन पसरविण्यात आली होती. या अफवेमुळे मारेगाव शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दारु दुकाने सुरु ठेवणाऱ्या शहरातील अनुज्ञप्तीधारक परिणीता परमानंद जयस्वाल यांच्या देशी दारु दुकानासमोर जमावाने शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला होता. परिस्थी,ती लक्षात घेता अनुज्ञप्तीधारकांनी दारुची दुकान 9 वाजुन 15 मिनिटांनी बंद केली होती.त्यामुळे शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यात यश मिळाले होते.शिवजयंती निमीत्त दारूची दुकाने बंद ठेवण्याचा कुठलाही आदेश अनुज्ञप्तीधारका पर्यंत पोहचला नसतांना दारु दुकाने बंदची अफवा पसरवली गेली आहे. ही अफवा पसरविणारे कोण? याबाबत शहनिशा करुन शांतता व सुव्यवस्था कायम अबाधीत राखण्यासाठी स्थानीक पोलीस प्रशासनाची दिरंगाई प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. दारु दुकाने बंद ठेवावी याबाबत कोणत्याही वृत्तपत्रात सुचना पत्र प्रकाशीत झालेली नाही. तसेच 7 दिवसा अगोदर अनुज्ञप्ती धारकांना प्रशासना कडुन कळविण्यात आलेले नाही. असे असतांना जमावांना दारु दुकान बंद असल्या बाबतची माहीती कशी प्राप्त झाली आहे.याबाबत चौकशीची आवश्यकता असुन खोटी माहीती पसरवुन समाजात कलह निर्माण करणाऱ्या वर कारवाई आवश्यक आहे. दारु दुकाने ऐनवेळी बंद करणे नियम बाह्य असताना पोलीस प्रशासना कडुन झालेली कारवाई संशयास्पद असल्याच्या प्रतीक्रिया सामाज माध्यमात उमटत आहे.चुकिच्या अमलबजावणीमुळे शांतता व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी पोलीस प्रशासनाची कामगिरी संशयास्पद असुन ठाणेदाराच्या मनमानी कामकाजामुळे शासनाचा 20 लाख रुपयाचा महसुल एकदिवशीय दारु बंदच्या अवैध कारवाईमुळे बुडाला आहे अशी प्रतीक्रिया अनुज्ञप्तीधारक जयस्वाल यांनी माध्यमात व्यक्त केली आहे.स्थानीक पोलीस स्टेशन अधिकारी यांना प्राप्त असलेले महाराष्ट्र दारु बंदी कायदा 1949चे कलम 142(2)अन्वये अधिकाराचा वापर करून बंद करू शकतात. परंतु आपले अधिकाराचा वापर करतांना महाराष्ट्र देशी दारु नियम 1973,नियम 26(1)(ड)प्रमाणे व महाराष्ट्र विदेशी मद्य नियम 1969मधील नियम 9 अ(2)(ड)खाली काही विशेष प्रसंगा निमीत्त अधिकृत राजपत्रात किमान7 दिवस अगोदर नोटीस देऊन आणि व्यापक प्रसार असणाऱ्यां स्थानिक वृत्तपत्रात जाहीर नोटीस देऊन देशी व विदेशी मद्य अनुज्ञप्त्या त्यांच्या कार्यक्षेत्रात बंद ठेवण्या बाबत कळविणे आवश्यक राहील. जेणे करून विद्यमान न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार नाही. मात्र, मारेगाव पोलीस स्टेशन अधिकारी यांनी मनमानी पध्दतीने कारवाई केल्यामुळे शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवला आहे.त्यामुळे विद्यमान न्यायालयाचा अवमान केल्याबाबत अनुज्ञप्तीधारक परमानंद जयस्वाल ठाणेदाराचे विरोधात अवमान याचिका दाखल करणार असल्याच्या प्रतीक्रिया प्रसिद्धीपत्रकातून दिल्या आहेत.
पोलीस प्रशासनाच्या अमलबजावणीमुळे शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर पोलीस प्रशासनाच्या अमलबजावणीमुळे शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर Reviewed by सह्याद्री चौफेर on February 19, 2025 Rating: 5
Powered by Blogger.