स्वराज्य सेने च्या वतीने छ. शिवाजी महाराज जयंती नवेगाव विरकुंड येथे साजरी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : तालुक्यातील नवेगाव विरकुंड येथे स्वराज्य सेना समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मूर्ती स्थापन सोहळा पार पडला. सर्वप्रथम छत्रपतीचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली, या अनुषंगाने प्रभात फेरी व लेझीम डान्स करून शालेय विद्यार्थीनी पायल नागमोते, नेहा मालेकार, मानवी पुनवटकर, वेदिका खापणे, वैदही एटी, सायली तुरणकर, शिवानी देवाळकर, जानवी देवाळकर, साक्षी एटी यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी इतरही विद्यार्थी उपस्थित होते.

नवेगाव विरकुंड स्वराज्य सेनेचे अध्यक्ष मा. राहुल भाऊ सातपुते, उपाध्यक्ष अमर चवले, ग्रामपंचायत सदस्य भूपेंद्र पावडे, बापूजी चवले, कार्तिक नागमोते, अक्षय ठाकरे, अभी देवाळकर, सुमित पावडे, प्रशांत एटी, सुरज मते, दीपक चवले, सुरज वासेकर, लुकेश घोंगे, तुषार धानोरकर, गजानन एटी, गोपाल नागरकर, प्रफुल पुनवटकर, शुभम मत्ते, डिमदेव मत्ते, मनीष देवाळकर, साहिल चवले, अजय डवरे, अमित डवरे, इत्यादी स्वराज्य सेनेचे पदाधिकारी व मित्र मंडळ तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.