सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : तालुक्यातील घोन्सा येथील संत गजानन महाराज प्रगटदिन सोहळा गुरुवारला मोठ्या उत्साहात पार पडला. केवळ घोन्साच नव्हे तर वणी, मारेगाव, झरी तालुका आणि विदर्भातून दूरदुरूनही हजारोंच्या संख्येने भाविक याठिकाणी दर्शनासाठी आले होते.
दिनांक १४ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी दिनांक २० फेब्रुवारीला सकाळी प्रगटदिनानिमित्त भव्य पालखी शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर दिवसभर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
श्री संत गजानन महाराज श्रद्धाश्रम मंदिर प्रवेशद्वाराचा लोकार्पण
गुरुवार दि. 20 फेब्रुवारी ला श्री संत गजानन महाराज श्रद्धाश्रम मंदिराच्या प्रवेशद्वाराचा लोकार्पण सोहळा सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया यांच्या हस्ते मोठ्या थाटात करण्यात आले. विशेष म्हणजे हे प्रवेशद्वार त्यांनी आत्मप्रेरणेतून बांधून दिले. या प्रवेशद्वार बांधकामासाठी लागणारा खर्च देणगी स्वरूपात ३ लाख ६० हजार रुपये रोख राशी श्री.चोरडिया यांनी मंदिर समितीकडे प्रदान केली. यावेळी पत्रकार राजू धावंजेवार, सामाजिक कार्यकर्ते राहुल मुंजेकर, संत गजानन महाराज मंदिर समितीचे अध्यक्ष दिलीप काकडे, संस्थेचे विस्वस्त पांडुरंग निकोडे, समस्त पदाधिकारी, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
विविध क्षेत्रातील मान्यवरांची मंदिराला सदिच्छा भेट
श्री संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त गुरुवारी चंद्रपूर-वणी-अर्णी क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर, वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, शिवसेनेचे सुधाकर गोरे, किशोर मालेकर, विलास बावणे, सरपंच मंगेश मोहुर्ले, उपसरपंच बाळू जिवने, सुधाकर गोरे, संतोष कुचनकर, पार्थ धानोरकर, कुंदन टोंगे, डॉ. जगन जुनगरी, सुनील नांदेकर यांचा समावेश होता.
सप्ताह भर शिव महापुराण कथा
श्री संत गजानन महाराज श्रद्धाश्रम मंदिरात शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे. हभप कु. स्वाती पंढरपूरकर आणि संच यांच्या सुश्राव्य वाणीतून कथेचे भाविकांना श्रवण करता येणार आहे. ही शिवमहापुराण कथा २१ फेब्रुवारी ते २६ फेब्रुवारी पर्यंत दररोज दुपारी २.३० वाजता या वेळेत सुरू होईल.
यात्रा महोत्सवात भव्य आनंद बाजार
श्री संत गजानन महाराज श्रद्धाश्रम मंदिर परिसरात भरलेल्या भव्य आनंद बाजारात मौत का कुवा, आकाश झुला, गधा शो, नावडी, क्रॉस झुला, ब्रेक डान्स, नाट्य मंडळ, जादुचे प्रयोग इत्यादी आनंद घेण्यासाठी तीनही तालुक्यांतील यात्रा महोत्सवात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
घोंसा: श्रींच्या प्रगटदिनी हजारों भाविकांनी घेतले दर्शन
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 22, 2025
Rating: