बंद सेतु सुविधा केंद्राची तत्काळ सेवा पूर्ववत करा- मादगी, मोची, मादरू, मादिगा महासंघाची मागणी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : गेल्या काही महिन्यांपासून तहसील परिसरातील सेतू सुविधा बंद स्थितीत असून सदर सेतु सुविधा केंद्र पूर्वरत करावी अशा आशयचे निवेदन मोची, मादगी, मादरू, मादीगा महासंघाकडून उपविभागीय अधिकारी वणी यांना (दि. १७) रोजी देण्यात आले आहे. 
     
वणी तहसिल कार्यालय परिसर मधील सेतु सुविधा केंन्द्र गेल्या दोन महिण्यांपासुन बंद असुन नागरीकांना या सेतु सुविधा केंद्रातुन सेवा मिळावी अशी आता सर्वसामान्य जनतेतून मागणी जोर धरत आहे. सेतु सुविधा केंद्र बंद असल्यामुळे ग्रामिण व शहरी भागातील नागरीकांना तहसिल कार्यालयातील शासकीय कागदपत्रे काढण्याकरीता मोठा नाहक त्रास सहन करावा लागत असुन काही नागरीकांना आल्या पावलीच परत जावे लागत आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. परिणामी नागरीकांची समस्या लक्षात घेवुन तहसिल कार्यालय परिसरातील सेतु सुविधा केंद्र तत्काळ सुरू करून नागरीकांची होणारी गैरसोय थांबवून सेवा प्रदान करण्यात यावी अशा मागणी मोची, मादगी, मादरू, मादीगा महासंघाकडून उपविभागीय अधिकारी वणी यांना करण्यात आली. 

यावेळी नत्थुजी नगराळे, सुरज चाटे, किशोर मंनथंवार, सदाशिव मंगळपवार, विजय आडराने, रीतिक मामिळवार, विशाल मामिडवार, प्रमोद मंथंनवार, प्रेम कोमलवार, रवी कोमलवार, सचिन चाटे आदी उपस्थित होते.
बंद सेतु सुविधा केंद्राची तत्काळ सेवा पूर्ववत करा- मादगी, मोची, मादरू, मादिगा महासंघाची मागणी बंद सेतु सुविधा केंद्राची तत्काळ सेवा पूर्ववत करा- मादगी, मोची, मादरू, मादिगा महासंघाची मागणी Reviewed by सह्याद्री चौफेर on February 22, 2025 Rating: 5
Powered by Blogger.