भाकपचे मारेगाव तालुका त्रैवार्षिक अधिवेशन उत्साहात संपन्न

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : भारतीय कम्युनिस्ट पक्ष मारेगाव तालुका शाखेच्या वतीने घेण्यात आलेल्या त्रैवार्षिक अधिवेशन काॅ.नथ्थु पाटील किन्हेकार सभागृहात पार पडले. पक्ष कार्यालयावर लाल झेंडा फडकवुन कार्यकर्त्यांनी झेंडा गितासह सलामी दिली. पारपारीक वाद्य वाजंत्रीच्या गजरात नारेबाजीसह मारेगाव शहरात प्रचंड रॅली काढण्यात आली. मुख्य रस्त्याने रॅली जात असतांना डाॅ.बाबासाहब आंबेडकर, भगतसिंग, बिरसा मुंडा यांचे पुतळ्याला व प्रतिमेला हारार्पण करण्यात आले.

रॅलीने संपुर्ण शहराचे व ग्रामीण नागरिकांचे लक्ष वेधत भगतसिंग चौकात रॅलीचे रुपांतर भव्य जाहीर सभेत झाले. सभेपुर्वी महाराष्ट्राचे क्रांतिकारी गायक काॅमरेड धम्मा खडसे व सृष्टी खडसे यांचा क्रांतिकारी गीतांचा कार्यक्रम.नंतर जाहीर सभेला ए.आय.एस.एफ चे राज्य उपाध्यक्ष काॅ. प्रसाद गोरे (परभणी),भाकपचे जिल्हासचिव कॉम्रेड अनिल घाटे, जिल्हा सहसचिव कॉम्रेड संजय भालेराव,किसान सभेचे राज्य कौन्सिलर काॅ .अनिल हेपट,सुनिल गेडाम यांनी मार्गदर्शन केले.

सभा संपवुन सभागृहात तालुक्यातील 32 गावातुन आलेल्या 150 प्रतिनिधींच्या अधिवेशन सत्राला सुरूवात झाली. पहील्या सत्रात अधिवेशनाचे उद्घाटन झाले,तालुका सचिव ढुमणे यांनी मागील तिन वर्षाचा राजकिय व संघटनात्मक अहवाल मांडला. अहवालावर 12 प्रतिनिधींनी आपली मते मांडली. दुसरया सत्रात पुढील तिन वर्षाकरिता 27 सदस्यीय तालुका कौंसिलची व पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. नविन कौंसिलने पुढील तिन वर्षाचा भविष्यकालीन कृती कार्यक्रम प्रतिनिधीसमोर ठेवला.तो सर्वांनी एकमताने मंजुर केला. निवड झालेल्या नविन पदाधिकऱ्यामध्ये
तालुका सचीव काॅ . बंडू गोलर व सहसचीव काॅ.ईरफान भाई, व काॅ.भास्कर सपाट यांची तसेच विविध जनसंघटनांचे पदाधिकारी म्हणुन किसान सभा तालुका अध्यक्ष काॅ. गणेश कळसकर, शेतमजूर युनियन तालुका अध्यक्ष काॅ. लक्ष्मण आत्राम.महीला फेडरेशन तालुका अध्यक्ष काॅ.लता रामटेके,आॅल इंडीया युथ फेडरेशन अध्यक्ष काॅ. प्रफुल आदे.सचीव अक्षय रामटेके, आॅल इंडीया स्टुडंन्ट फेडरेशन अध्यक्ष काॅ.सुनील जुनगरी, आयटक जनसंटना चे प्रेमीला मलकापूरे,आशा खामनकर, नीता सोयाम, सुरेखा मिलांदे, शब्बीर खाॅ पठान यांचे सर्वांनी पुषपगुच्छ देऊन अभिनंदन केले. 

संपुर्ण कार्यक्रमाचे संचालन काॅ. प्रेमीला मलकापुरे यांनी तर आभारप्रदर्शन काॅ.बंडु गोलर यांनी मानले.शेवटी विसावे त्रैवार्षिक अधिवेशन थाटात पार पडले.
भाकपचे मारेगाव तालुका त्रैवार्षिक अधिवेशन उत्साहात संपन्न भाकपचे मारेगाव तालुका त्रैवार्षिक अधिवेशन उत्साहात संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on February 22, 2025 Rating: 5
Powered by Blogger.