सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : गुन्हेगारीकडे वळणाऱ्या तरुणांसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांचे संकल्पनेतून व अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप यांचे मार्गदर्शनात यवतमाळ पोलीस दलाचे माध्यमातून "ऑपरेशन प्रस्थान" हा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात आला. आज दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी शनिवारला स्थानिक तकरी मंदिरात वणी, शिरपूर, मारेगाव, मुकुटबन, पाटण पोस्टे हद्दीतील युवक व युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये 1102 युवक व 118 युतींनी सहभाग नोंदविला. अशी माहिती पोलीस प्रशासणांनी दिली.
या रोजगार मेळाव्यामध्ये 10 वेगवेगळ्या कंपन्याचा सहभाग होता. सदर रोजगार मेळाव्यात एकूण 1320 युवक व युवती यांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्ये पात्र उमेदवारांना लवकरच कंपनीकडून नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. सदर रोजगार मेळाव्यात मुलाखतीस आलेल्या सर्व उमेदवारांना तसेच सर्व पोलीस अधिकारी व अमलदारांना जेवणाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पोलीस प्रशासनातर्फे उत्तम करण्यात आली होती.
सदर रोजगार मेळावा गणेश किंद्रे उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांचे देखरेखेत गोपाल उंबरकर पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन वणी, माधव शिंदे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन शिरपूर, संजय सोळंके पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन मारेगाव, दिलीप वडगावकर पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन मुकुटबन, स्वप्निल ठाकरे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन पाटण, त्यांच्या अधिनिस्त असणारे अधिकारी व अमलदार यांचे उपस्थितीत सदर रोजगार मेळावा हा सकाळी नऊ वाजतापासून सुरू होऊन सायंकाळी पाच वाजता समाप्त करण्यात आला.
यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे संकल्पनेतून वणी येथे भव्य रोजगार मेळावा संपन्न
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 22, 2025
Rating: