25 फेब्रुवारीपासुन पांडवदेवी यात्रा महोत्सव

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : तालुक्यातील पांडवदेवी मंदिर येथे महाशिरात्री निमीत्त 25 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी पर्यंत तीन दिवशीय यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

पांडवदेवी देवस्थान ट्रस्ट तिवसाळा आवळगाव च्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही "महाशिवरात्री" यात्रा महोत्सव मोठ्या उत्सहात साजरा करण्याचे ठरविण्यात आले आहे.
वनश्री ने नटलेल्या भुमातेच्या कवेत पांडवांचे साक्षीने हजोरा वर्ष संत,भक्तांनी प्रतिक्षा करुन याठिकाणी हेमांडपंथी शिवालय निर्माण केले अशी आख्यायिका आहे.

त्यामुळे विदर्भात प्रसिद्ध दरवर्षी पांडवदेवी देवस्थान ट्रस्ट तिवसाळा आवळगाव चे वतीने भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यात्रेत भाविक मोठ्या श्रध्देने येत असतात,दरवर्षीची भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता यंदा ट्रस्टीचे वतीने मोठ्या प्रमाणात सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.पांडवदेवी देवस्थान ट्रस्टीचे अध्यक्ष नानाजी परचाके यांनी पोलीस प्रशासनाला आयोजीत महोत्वासाठी सुरक्षा मागितली आहे. तसेच पिण्याचे पाणी, व ईतर सोयीची तयारी केलेलीआहे.

यशस्वीतेसाठी अध्यक्ष नानाजी परचाके, नारायण मडावी, मंगला पेंदोर,निलेश परचाके, उमेश बावनकर, तुळशीराम कुमरे, तुळशीराम पेंदोर,बंडु,उईके,हनुमान मरस्कोले, शबीरा मडावी,पार्वता कोयचाडे,यासह सदस्य प्रयत्न करीत आहे.
25 फेब्रुवारीपासुन पांडवदेवी यात्रा महोत्सव 25 फेब्रुवारीपासुन पांडवदेवी यात्रा महोत्सव Reviewed by सह्याद्री चौफेर on February 23, 2025 Rating: 5
Powered by Blogger.