ती बाळंतीण झाली आणि बालविवाहाचे बिंग फुटले

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : बारा तेरा वर्षं हे वय कोणत्याही लहान मुलाचं किंवा मुलीचं खेळण्याबागडण्याचं वय असतं. मात्र,या कोवळ्या वयात बालविवाह करणं आणि त्यानंतर मातृत्व लादणं जाणं हा कायद्याने गुन्हा आहे. हा गुन्हाच राजूर कॉलरीत आईवडिलांकडून घडला. याप्रकरणी पीडीतेशी लग्न करणारा युवक आणि तिच्या आईवडील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीने ग्रामीण रुग्णालयात मुलाला जन्म दिला. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

पोलिसांच्या माहितीनुसार आई वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलीचा विवाह 23 जुन ला 2023 ला एका 25 वर्षीय मुलासोबत लावून दिला. लग्नानंतर पीडित बालिका ही गरोदर झाली. 22 फेब्रुवारीला आपल्या गरोदर मुलीला रुग्णालयात नेले, यावेळी तीने मुलाला जन्म दिला. मात्र, अल्पवयीन मुलगी बाळंतीण झाल्यावर हा प्रकार उघडकीस आला आहे. 

या गंभीर प्रकरणाची दखल घेत याविरुद्ध पोलिसात तिच्याशी लग्न करणारा मुकेश निषाद याच्यासह मुलीचे वडील रामबरण केवट (वय 50) व त्याची पत्नी (वय 45) रा. निंभोरा ता. बदेरू जि. बांदा (उ.प्र.) यांच्यावर भादंवि च्या कलम 376 (2) (N) व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अल्पवयीन मुलीशी लग्न करून तिला गर्भवती करणाऱ्या मुकेश निषाद याला पोलिसांनी अटक केली असून, त्याला पांढरकवडा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची तुरुंगवारी केली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनात सपोनि निलेश अपसुंदे करीत आहे.


ती बाळंतीण झाली आणि बालविवाहाचे बिंग फुटले ती बाळंतीण झाली आणि बालविवाहाचे बिंग फुटले Reviewed by सह्याद्री चौफेर on February 23, 2025 Rating: 5
Powered by Blogger.