वैराग्यमूर्ती श्री संत गाडगेबाबांचा जयंती महोत्सव: विविध उपक्रम

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : श्री बाबांची १४९ वी जयंती महोत्सव विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वांनी तन-मन धनाने सहकार्य करुण आयोजीत केलेल सर्व कार्यक्रम यशस्वी होतील यासाठी मित्र, आप्तेष्ट, सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन अध्यक्ष राहुल गोपाल चौधरी यांनी केले आहे.

वैराग्यमुर्ती श्री. संत गाडगेबाबा यांच्या जयंतीच्या निमीत्ताने श्रध्देय बाबांच्या प्रेरणादायी विचारांची व कार्याची उजळण व्हावी त्यांच्या अलौकीक कार्याचे पुण्यस्मरण व्हावे. नव्या तरुण पिढीला त्यांच्या मौलीक विचारांचे मार्गदर्शन व्हावे अशा विवि पैलुचा विचार करता या उद्दात हेतुने श्री संत गाडगेबाबा जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

22 फेब्रुवारीला दुपारी 4 वाजता श्री संत गाडगेबाबा चौकातून बाबांच्या प्रतिमेला हार अर्पण करून भव्य शोभायात्रा शहारातील मुख्य रस्त्याच्या काढण्यात येणार आहे. संध्याकाळी श्री संत गाडगेबाबा स्मारक स्थळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजीत केले आहे. 23 फेब्रुवारी संत गाडगेबाबांच्या जयंतीदिनी पहाटे महास्वच्छता अभियान, सकाळी नऊ वाजता स्मारकाला हारार्पण, सकाळी दहा वाजता ग्रामीण रुग्णालय वणी येथे श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने रुग्णांना फळ वाटप, सकाळी 11 वाजता प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये गाडगेबाबांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. दुपारी 12 वाजता बाल कीर्तनकार कुमारी जानवी घुमे नागपूर यांचा तुफान विनोदी समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजीत केला आहे.

कार्यक्रमाचे उद्द्घाटक हंसराज अहीर माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी आयोग दिल्ली, कार्यक्रमांचे अध्यक्ष वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर, प्रमुख उपस्थिती संजीवरेड्डी बोद‌कुरवार, माजी आमदार, तारेंद्र बोर्डे, माजी नगराध्यक्ष वणी जिल्हाध्यक्ष भाजपा, वामनराव कासावार माजी आमदार, विजयबाबु चोरडिया, सामाजिक कार्यकर्ता, राजुमाऊ उंबरकर, महाराष्ट्र मनसे नेते, गोपाल उंबरकर ठाणेदार वणी, अ‍ॅड.देविदास काळे अध्यक्ष रंगनाथ स्वामी पतसंस्था वणी, राकेश खुराणा, माजी न.प. अध्यक्ष, वणी, सचिन गाडे मुख्याधिकारी न.प. वणी, संजय खाडे अध्यक्ष रंगनाथ निधी अर्बन बैंक, राहुल गोपाल चौधरी अध्यक्ष धोबी समाज, वणी रमाताई रा. क्षिरसागर, महिला अध्यक्ष धोबी समाज, माजी नगरसेवक राजु तुराणकर, प्रदिप मुके, बंडूजी महाकुलकर, राजेंद्र क्षिरसागर, अरविंद क्षिरसागर माजी उपाध्यक्ष, शेखर चिंचोलकर, विठ्ठल केळवतकर, विठ्ठल महाकुलकर, कैलास बोबडे, दिपलाल चौधरी, ज्ञानेश्वर भोंगळे, बंडुजी मोतेकर, बबन चिंचोलकर, बाळु तुराणकर, सुनिल दाढे, भास्कर दाढे, राजेश क्षिरसागर, राजेश महाकुलकर, प्रविण वाघमारे, नंदू बोबडे, उमाकांत भोजेकर, दिलीप मस्के, कवडु दुरुतकर, श्रीमती कलावती क्षिरसागर यांचे उपस्थितीत हा जयंती महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
वैराग्यमूर्ती श्री संत गाडगेबाबांचा जयंती महोत्सव: विविध उपक्रम वैराग्यमूर्ती श्री संत गाडगेबाबांचा जयंती महोत्सव: विविध उपक्रम Reviewed by सह्याद्री चौफेर on February 21, 2025 Rating: 5
Powered by Blogger.