सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : स्थानिक मारेगाव येथील तसेच पाथरी येथील महत्त्वपूर्ण प्रश्नावर येथील पंचायत समिती समोर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ६७ वर्षीय नेते कॉ. पुंडलिक ढुमने हे दिनांक २० फेब्रुवारी २०२५ पासून आमरण उपोषणाला बसले आहेत. जो पर्यंत समस्या चे निराकरण करण्यात येत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू राहील असा निर्धार करण्यात आला आहे.
मौजा पाथरी येथील सरकारी स्मशान भूमीची जागा अतिक्रमण केल्याने ताबडतोब जागा मोकळी करावी, स्मार्ट मीटर लावणे बंद करा, रस्त्यावरील बेशिस्त वाहनांमुळे रहदारीला अडथळा होत असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होतो आहे, त्यामुळे तो व्यवस्थित करावा, रस्त्यावर भरणारा आठवठी बाजार अन्यत्र भरवावा आदि मागण्यांवर माकपचे कॉ. पुंडलिक ढुमने हे आमरण उपोषणाला बसले आहेत.
गावाचा सन्मानात, आम्ही उतरलो मैदानात, म्हणत लढेंगे तो जितेंगे हा नारा देत आमरण उपोषण सुरू करताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ. ॲड. कुमार मोहरमपुरी, तालुका सचिव कॉ. रामभाऊ जिद्देवार, डॉ. श्रीकांत तांबेकर, सुदर्शन टेकाम आदि उपस्थित होते.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मारेगावात आमरण उपोषण सुरू करताच प्रशासन कामाला लागले असून प्रश्न ताबडतोब सोडविण्यात येईल असे संकेत प्रशासनाकडून मिळाले आहेत.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मारेगाव येथे आमरण उपोषण सुरू
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 21, 2025
Rating: