सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगांव : मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या मारेगांव तालुका अध्यक्षपदी अमोल कुमरे यांची नियुक्ती करण्यात आली.
ही नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजु धावंजेवार यांनी केली. सामान्य माणसावर होणाऱ्या अन्याय व अत्याचारा विरोधात मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे अमोल कुमरे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
नवनियुक्त अध्यक्ष श्री कुमरे यांचं सर्व स्तरावरून अभिनंदनसह शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मानवी हक्क सुरक्षा परिषदेच्या मारेगांव तालुका अध्यक्ष पदी श्री. अमोल कुमरे यांची नियुक्ती
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
February 16, 2025
Rating: