वणीत 'स्वप्नपूर्ती सोहळा' हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत संपन्न

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

वणी : वणी विधानसभा क्षेत्रातील शिवसैनिकांच्या वतीने आयोजित शिवसैनिकांचा स्वप्नपूर्ती सोहळा दिनांक 15 फेब्रुवारीला स्थानिक एस बी लॉन मध्ये यवतमाळ वाशिम लोकसभा क्षेत्राचे खासदार संजय देशमुख व वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर व जिल्हा संपर्क प्रमुख राजेन्द्र गायकवाड यांच्या उपस्थितीत दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्यात वणी मारेगाव झरी तालुक्यातील सर्व शिवसैनिकांनी हजेरी लावली होती.

शिवसैनिकांची एकनिष्ठता हिच शिवसेनेची खरी ओळख - खासदार संजय देशमुख
शिवसेनेची ओळख म्हणजे शिवसैनिकांमध्ये असलेली एकनिष्ठता आहे. ही एक निष्ठता ज्यांच्या रक्तात आहे. ते रक्त कधीच बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणार नाही. आहे प्रतिपादन यवतमाळ वाशीम लोकसभा क्षेत्राचे खासदार संजय देशमुख यांनी येथील एस.बी. लॉनच्या प्रांगणात काल ता. १५ रोजी रात्री ८ वाजता संपन्न झालेल्या शिवसेनेच्या स्वप्नपूर्ती या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना व्यक्त केले.

अतिशय नियोजन बद्द सुरेख सुंदर रूपरेषा ठरल्याप्रमाणे दीप प्रज्वलाने कार्यक्रमाची सुरूवात यवतमाळ वाशिम लोकसभा क्षेत्राचे खासदार संजयभाऊ देशमुख क्षेत्राचे खासदार व विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर व कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेन्द्रजी गायकवाड शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख यवतमाळ यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व मासाहेब मिनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन व हरार पण करून उद्घाटन करण्यात आले.यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख अमोल धोपेकर, योगीता मोहाड यवतमाळ जिल्हा महिला संघाटिका, संतोष माहुरे वणी विधानसभा सहसंपर्कप्रमूख,डॉ अर्चना पाटील यवतमाळ, डॉ.मनीष मस्की नगराध्यक्ष मारेगाव नगर पंचायत,ज्योती बीजगुणवार नगराध्यक्ष झरी नगर पंचायत,संकेत ठाकरे युवासेना जिल्हाप्रमुख यवतमाळ हे उपस्थित होते. सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

सत्कार व सन्मान सोहळा.
यवतमाळ वाशिम लोकसभा क्षेत्राचे खासदार संजय देशमुख व वैशाली ताई देशुमख व वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर व किरनताई देरकर यांचा शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ व  विठ्ठल रुखमाई यांचे भव्य मोमिंटो देवुन आयोजन कमिटीचे दीपक कोकास माजी उपजिल्हा प्रमुख, रवि बोढेकर तालुका प्रमूख, गणपत लेडांगे तालुका संघटक,अजिंक्य शेंडे युवासेना उपजिल्हा प्रमुख, राजु तुरणकर माजी नगरसेवक, नितिन शिरभाते ज्येष्ठ शिवसैनिक, संजय देठे, प्रशांत बलकी उप शहर प्रमूख भगवान मोहीते, डॉ जगन जूनगरी, मनिष बत्रा, विनोद ढूमने, मंगेश मत्ते, आयुष ठाकरे युवासेना तालुका संघटक, डीमन टोंगे उपजिल्हा संघाटीका, गीता उपरे सरपंच लालगुडा, सुनंदा गुहे महीला संघटीका, पुष्पताई भोगेकर माजी सभापती, किर्ती देशकर नगर सेविका, वनिता काळे महीला संघटिका मारेगाव तालुका, सविता आवारी ,चंदा मून माजी सभापती पंचायत समिति वणी, प्रभाताई आसेकर, सविता बलकी व सुनिल कातकडे वणी विधानसभा संघटक, संजय निखाडे उपजील्हा प्रमूख, शरद ठाकरे उपजिल्हा प्रमुख, सुधीर थेरे, अभय चौधरी शहर प्रमूख या पदाधिकाऱ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला वणी,झरी, मारेगाव तीनही तालुक्यातील फार मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिकांनी उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमांमध्ये प्रचंड जोश व उत्साहाचे वातावरण होते तर कौटुंबिक वातावरणामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाचे प्रस्ताविक गणपत लेडांगे यांनी तर सूत्रसंचालन राजू तुरणकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रकाश कऱ्हाड यांनी केले.

शिवसेनेत पक्ष प्रवेश
समाजसेवक मोरेश्वर उज्वलकर व प्रवीण राजूरकर गोंडबुरांडा सामजिक कार्यकर्ता यांचा खासदार संजय देशमुख यांचे हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश करण्यात आला.


शिवसैनिकांना सन्मानाची वागणूक व त्यांचे स्वप्नपूर्ती करण्याची जबाबदारी माझी-  आमदार संजय देरकर
स्वप्नपूर्ती सोहळ्यात आमदार संजय देरकर यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला, सन्मानाप्रती मनोगत व्यक्त करताना आमदार संजय देरकर यांनी शिवसैनिकांना मला निवडून आणण्यासाठी घेतलेल्या मेहनती बद्दल व दिलेल्या प्रेमा बद्दल मनोमन आभार व्यक्त करीत, संपूर्ण शिवसैनिकांना सन्मानाची वागणूक देऊन त्यांना योग्य प्रतिष्ठा मिळवून देऊन त्याचे जीवनमान उंचावण्याचे काम माझ्या हातून घडेल व माझी स्वप्न त्यांनी पूर्ण केली असेल पण त्यांचे स्वप्नपूर्ती करण्याची जबाबदार आता माझी असल्याचे भाऊक प्रतिपादन आमदार संजय देरकर यांनी केले.
वणीत 'स्वप्नपूर्ती सोहळा' हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत संपन्न वणीत 'स्वप्नपूर्ती सोहळा' हजारो शिवसैनिकांच्या उपस्थितीत संपन्न Reviewed by सह्याद्री चौफेर on February 17, 2025 Rating: 5
Powered by Blogger.