सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : संभाजी ब्रिगेड चे जिल्हाधक्ष (यवतमाळ पूर्व) अजय धोबे यांचे संभाजी ब्रिगेड मधून निलंबित करण्यात आले आहे. संघटनेचे विभागीय अध्यक्ष गजानन भोयर यांनी याबाबतचे पत्र दिले आहे.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक २०२४ मध्ये संभाजी ब्रिगेड राज्यात स्वबळावर निवडणुक लढत आहे. पक्षाने आपणास वणी विधानसभा मतदारसंघ-७६ मध्ये उमेदवार म्हणुन ए.बी. फॉर्म दिला होता, परंतु आपण पक्षाने दिलेली उमेदवारी, कोणत्याही प्रकारचा संवाद न साधता अर्ज मागे घेतला. महाविकास आघाडीतील घटकपक्षांना पाठिंबा जाहीर केला तसेच प्रचार-प्रसार करत असतांना आढळून आले आहे. त्याअनुषंगाने आपण पक्षविरोधी भुमिका घेतल्यामुळे आपणास ताबडतोव जिल्हा अध्यक्ष यवतमाळ (पूर्व) या पदावरून निलंबित करण्यात येत आहे.
त्यांचे कृत्य पक्षाच्या शिस्तीचा भंग करणारे आहे. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले असल्याचे भोयर यांच्या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.