सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : वणी विधानसभा मतदारसंघातील विविध घडामोडी घडत असताना अपक्ष उमेदवार संजय खाडे यांच्या प्रचाराने आघाडी घेतली असल्याचे चर्चा रंगत आहे.
शहरातील दिपक चौपाटी येथील रंगनाथ स्वामी मंदिरातून "शिट्टी" चा प्रचार नारळ फोडण्यात आल्यानंतर पंजाचे, शिवसैनिक, मित्र पक्ष व संस्था, आघाडी च्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या उत्सहाने कामाला लागल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रचार कार्यात कोणतीही कसर बाकी राहू नये याची पुरेपूर खबरदारी बाळगत मोठ्या फरकाने संजय खाडेंचा विजय निश्चित असल्याची कार्यकर्त्यातून बोलल्या जात आहे.
वणी, मारेगाव, झरी तालुक्यातील पूर्वीश्रमींचे पदाधिकारी, कार्यकर्ते मतदारांना पटवून सांगत आहे. संजय खाडे यांना स्वतःहून नागरिक त्यांच्या स्वागतासाठी, पाठिंब्यासाठी पुढे येताना दिसत आहेत.
माजी आमदार विश्वास नांदेकर, काँग्रेस चे जेष्ठ नेते नरेंद्र ठाकरे, पुरुषोत्तम आवारी, संजय आवारी, प्रमोद वासेकर, तेजराज बोढे, प्रशांत गोहोकार, तुळशीराम कुमरे, सुनील गेडाम, जीवन काळे, यांच्यासह महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते अपक्ष उमेदवार संजय खाडे यांना निवडून आणण्यासाठी प्रण केल्याचे एकंदरीत चित्र वणी मतदार संघात दिसून येत आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक भल्ली चूरशीची होणार असल्याचे चर्चा रंगत आहे.