सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : आदिवासी समाजातील विविध संघटनांच्या उपस्थितीत 11 ऑक्टोबर पासून धरणे आंदोलन करण्याचा निर्णय गुरुवारी वणी येथील शासकीय विश्रामगृहात घेण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आज (ता.3) ला जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पाताई आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. दरम्यान,समाजाच्या मागण्यांच्या अनुषंगाने आदिवासी समाजातील सर्व संघटनांना अवगत करून बैठकीत न्याय संसदेत प्राप्त प्रश्न, समस्याचा अहवाल सादर करण्याचा निर्णय उपस्थित आदिवासी समाज संघटना समन्वय समिती द्वारा महाराष्ट्र सरकार व विशेषतः मुख्यमंत्र्यांचा जाहीर निषेध करण्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी ठरविले.
आदिवासी समाजात गैरआदिवासीकडून सातत्याने घुसखोरीची भाषा केली जाते, हे असंविधानिक असूनही राज्य शासन गांभीर्याने घेत नाही, उलट त्यांची पाठराखण करतात, त्यामुळे सर्व आदिवासी समाज रस्त्यावर उतरून गैरआदिवासीची घुसखोरी व सरकारने कोणतेही चुकीचे निर्णय घेऊ नये आणि समाजासमाजात आपसी भांडण लावू नये, असे उपस्थितांनी यावेळी चर्चेअंती सांगितले. तसेच या सरकार विरोधी धरणे आंदोलनाला आदिवासी समाजाने मोठ्या संख्येने हजर राहण्याचे आवाहन केले.
वणी शासकीय विश्रामगृहात झालेल्या या बैठकीस पुष्पाताई आत्राम, गीत घोष, ॲड. अरविंद सिडाम, रामदास गेडाम, श्रीकृष्ण मडावी, भाऊराव आत्राम, वसंत चांदेकर, अशोक नागभीडकर, अशोक राजगडकर, पत्रकार संदीप बेसरकर, कुमारअमोल, महेश आत्राम, शरद बेसकर, नंदकुमार बोधकर, रामकृष्ण सिडाम, पी डी आत्राम, विनोद बोरकर, लहानू सालूरकर यांच्यासह आदिवासी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
आदिवासी संघटनाकडून धरणे आंदोलनाची घोषणा; पुष्पाताई आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 03, 2024
Rating: