सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : शहरात ठिकठिकाणी नवरात्रीनिमित्त गरबा उत्सवाचे आयोजन केले गेले असून वणी शहरात पहिल्यांदाच राजे गरबा महोत्सव 2024 चे वसंत जिनिंग लॉन येथे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे मराठी श्रुष्टीतील कलाकारांची उपस्थिती या गरबा उत्सवात असणार आहे.
4 ऑक्टोबरला चला हवा येऊ द्या फेम सिने अभिनेता भारत गणेशपुरे तर, 9 ऑक्टोबरला महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेत्री शिवाली परब आणि 10 ऑक्टोबरला प्रसिद्ध मराठी सिने अभिनेत्री सोनाली कुळकर्णी ही येणार असून वणीकरासोबत हे मराठी नट नटी गरब्याचा आनंद लुटणार आहेत.
दररोज आकर्षक बक्षीसासह नऊ दिवस चालणाऱ्या राजे गरबा महोत्सवात निशुल्क सेवा असल्याची माहिती आयोजकांनी दिली. त्यामुळे उद्यापासून होणाऱ्या गरबा महोत्सवात वणीसह परिसरातील गरबाप्रेमिनी सहभागी व्हावे, असे आवाहन वसंत जिनींग अध्यक्ष आशिष खुलसंगे व सभापती गौरीशंकर खुराणा यांच्या वतीने करण्यात येत आहे.
वणीत सिनेकलाकारांच्या उपस्थितीत राजे गरबा उत्सव
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 03, 2024
Rating: