सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : स्वातंत्र्य मिळालं, मात्र, स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ताच मिळाला नसल्यामुळे तालुक्यातील गौराळा ग्रामस्थांनी आगामी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आज (ता. 3) गुरुवार रोजी घेतला. यासंदर्भात तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
तालुक्यातील अनेक गावात स्मशानभूमीच नाही. तर स्मशानभूमी असुन त्याकडे जाण्यासाठी रस्ता नाही. हिच परिस्थिती गौराळा येथे असून स्मशानभूमी आहे, मात्र रस्ता नसल्याने अंत्यविधी करायचा कसा असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला जात आहे. यापूर्वी शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेक आंदोलन केले गेले. मात्र, तरीही समस्या काही सुटली नाही. आमदार खासदार व जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदन पाठवून सुद्धा प्रश्न मार्गी लागला नाही. अखेर तोंडावर असलेल्या वणी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असुन, गावातील नागरिकांनी या संदर्भात एक निवेदन तहसीलदार उत्तम निलावाड यांना सादर केलं आहे.
यावेळी सोमेश्वर गेडेकर, सुरेश काळे, अरविंद तुराणकर, गणेश येरगुडे, योगेश भोयर, अंकुश मडावी, प्रफुल काकडे, यासह असंख्य गावातील महीला पुरुष हजर होते.
गौराळा येथील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
October 04, 2024
Rating: