मारेगाव तालुक्यातील विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजनाचा धुमधडाका


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : राज्यात विधानसभा निवडणूकीचे वेध लागले असून वणी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी आपल्या मतदारसंघात विकासकामांचा झंजावात धूमधडाका लावला आहे.
त्यांच्या विशेष प्रयत्नातून तालुक्यातील जळका, म्हैसदोडका, करणवाडी, टाकळी कुंभा व सिंधी येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण विद्यमान आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते करण्यात आले आहे. 
याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष किसान मोर्चा दिनकर पावडे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष शंकर लालसरे, भाजपा तालुकाध्यक्ष अविनाश लांबट, माजी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, भाजपा तालुका उपाध्यक्ष मारोती तुराणकर, सरचिटणीस गणेश झाडे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर थेरे, गणेश खडसे, नाना पाटील डाखरे, दिनेश गेडाम व भाजपा कार्यकर्ते, सरपंच व उपसरपंच आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आजपर्यंतच्या इतिहासामध्ये ग्रामीण भागात कधीही एवढी विकासात्मक कामे पाहायला मिळाली नव्हती. परंतु या दहा वर्षांमध्ये मारेगाव तालुक्यातील अनेक गावात विकासात्मक काम होताना दिसत आहे. जर नेतृत्वामध्ये इच्छाशक्ती असेल आणि सेवाभाव असेल तर अशक्य असे काहीच नाही हे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार साहेब यांच्या निमित्ताने दिसून आलेले आहे. आ.बोदकुरवार यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या मतदार संघांसाठी निधी खेचून आणला आहे.या कामाचे श्रेय घेण्याच्या ऐवजी आणखी दुसऱ्या विकास कामासाठी आमदार साहेब यांचे प्रयत्न सुरु आहे, त्यांच्या नेतृत्वात तालुक्याचा कायापालट होणार आहे.

-अविनाश लांबट 
भाजपा तालुका अध्यक्ष, मारेगाव 





मारेगाव तालुक्यातील विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजनाचा धुमधडाका  मारेगाव तालुक्यातील विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजनाचा धुमधडाका Reviewed by सह्याद्री चौफेर on October 04, 2024 Rating: 5
Powered by Blogger.