मारेगाव येथे दिव्यांगाना सायकल व महिलांना साडी वाटप

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजय चोरडिया यांच्या सामाजिक दायित्वातून दिव्यांगाना सायकल तर, महिलांना साडी वाटपाचा कार्यक्रम मारेगाव येथील हनुमान मंदिरातील सभागृहात आयोजन करण्यात आले होते.
     
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजय चोरडीया तर प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, भाजपाचे शंकर लालसरे, ता. सरचिटणीस प्रशांत नांदे, अशोक सिंग, मनोज केळकर, मयूर गोयनका, मानवी हक्क परिषदचे प्रदेशाध्यक्ष राजू धावांजेवार, अनुप महाकुलकर, सागर मुने आदी उपस्थित होते. 
या प्रसंगी विजय चोरडिया व्यक्त होताना म्हणाले की,माझ्याकडून गोरगरीब,गरजुंना नेहमीच मदत करण्याचा प्रयत्न असतो, कारण मानवतेची सेवा जीवनाचे सर्वोत्तम कार्य आहे. मोदीसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त अपंगाना सायकल वाटप व महिलांना साडी वाटप करीत आहो एक छोटासा प्रयत्न आहेत. विजयबाबु चोरडीया मित्र परिवार तथा, मारेगाव तालुका भाजपाच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस थाटात संपन्न झाला. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश देशपांडे यांनी केले. वाढदिवस निमित्ताने सुरेश चामाटे (देवाळा), सुरज वाकुडकर (गदाजी बोरी), राजू महाकुलकर (मारेगाव), बाबाराव कांबळे (मार्डी), संजय जिवतोडे (मार्डी), प्रफुल गिरी या दिव्यांग व्यक्तींना सायकल व महिलांना साडी वाटप करण्यात आले.

मारेगाव येथे दिव्यांगाना सायकल व महिलांना साडी वाटप मारेगाव येथे दिव्यांगाना सायकल व महिलांना साडी वाटप Reviewed by सह्याद्री चौफेर on September 19, 2024 Rating: 5
Powered by Blogger.