सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 74 व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षात मारेगाव तालुक्यातील चोपण येथील शेकडो नागरिकांनी पक्ष प्रवेश केला आहे. या पक्ष सोहळ्याने सर्वत्र सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहेत.
तालुक्यातील चोपण येथे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावकुळे यांच्या मार्गदर्शनात व वणी विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे विकास कामे व कार्य पाहून तरुण तथा गावातील युवा तसेच जेष्ठ नागरिकांनी तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश घेतला.
प्रत्येक नागरिकांपर्यंत योजना पोहोचवण्याचं कार्य या भाजप पक्षाचे कार्यकर्ते करीत आहेत सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवण्याचं कार्य आम्ही सतत करत राहू गावाच्या विकासात्मक दृष्टिकोनातून काम करणारे भाजपा आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार गावागावात जाऊन सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवीत आहे. गावांचा विकासाचा कायापालट केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत भाजपा पक्षांचा हेतू आहेत, प्रत्येक गावात विकासाला निधी देण्यास भाजप पक्ष कधी कमी पडणार नाही हा भाजप पक्षांचा उदांत हेतू आहे. त्यामुळेच आज भाजप पक्षात गावागावात शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपा पक्षात प्रवेश करण्याचे सत्र चालू आहेत. असे तालुका अध्यक्ष यावेळी म्हणाले.
आज (ता. 18) रोजी चोपण येथील शेकडो नागरिकांनी भाजप पक्षाच्या कार्य शैलीवर विश्वास ठेवून प्रवेश केला, यावेळी तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांनी स्वागत सर्वांचे केले. या सभेला गावातील नागरिक व भाजपा जेष्ठ नेते बोबडे गुरुजी, भाजपा महामंत्री मंगेश देशपांडे,भाजपा सचिव युवा मोर्चा प्रसाद ढवस, विजय खिरटकर, शेखर काळे, प्रसाद झाडे, अतुल खिरटकर, पंकज खिरटकर व भाजपा कार्यकर्ते आणि गावकरी तसेच परिसरातील भाजप पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये जाहीर पक्ष प्रवेश
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 19, 2024
Rating: