सह्याद्री चौफेर | कुमार अमोल
वणी : वणी विधासभा क्षेत्राच्या इतिहासात अजरामर असे मोफत आरोग्य शिबीर राबविण्यात ज्यांचा हातखंड मानला जातो असे, भाजपाचे कार्यकारिणी सदस्य तथा समाजसेवी विजयबाबू चोरडिया यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे, असे प्रतिपादन भाजपाचे दिनकरराव पावडे यांनी केले. ते माथार्जून (ता.झरी) येथील आरोग्य शिबिरात बोलत होते. कुठलाही उपक्रम असो त्यांनी पुढाकार घेतला की, तो यशस्वी झाल्याशिवाय राहत असेही ते म्हणाले.
यावेळी भाजपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य विजय चोरडिया, दिनकरराव पावडे, मानवी हक्क सुरक्षा परिषद प्रदेश अध्यक्ष राजु धावंजेवार, श्रीराम भोयर, वैशाली भोयर, संभाजी नगराळे, अशोक सिंग, देविदास चुक्कलवार, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
पुढे ते म्हणाले की, सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिलेले असे आमचे स्नेही विजयबाबू,संपूर्ण जबाबदारीने आरोग्य शिबीर असो की कुठलाही उपक्रम, त्यांनी पुरेपूर यशस्वीरित्या पार पडण्याचं कार्य केले. त्यामुळे इथे मोफत आरोग्य शिबीर आपण मोठ्या संख्येने सहभागी होऊन लाभ घेत आहोत. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त ह्या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, दरम्यान भाजपा वणी विधानसभा व विजय चोरडिया मित्र परिवार यांच्या वतीने मोदी साहेबांना वाढदिवसाच्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्या दिल्या.
या प्रसंगी बोलताना.. मात्र, मोफत आरोग्य शिबीर आता घराघरा पर्यंत मोठ्या प्रमाणात पोहचत असून विजय चोरडिया यांच्या सामाजिक दायित्वातून अनेक गरजूना त्याचा फायदा होत आहे,त्यांचे कार्य या क्षणी सांगावे तितके कमीच आहे, असा सामाजिक कार्यकर्ता पुन्हा होणे नाही, असे गुरुदेव उपासक संभाजी नगराळे यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या.
गंगामाता मंदिर येथे आयोजित मोफत नेत्र चिकित्सा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मोफत चष्मे वाटप व आरोग्य तपासणी करून परिसरातील हजारो नागरिकांनी यावेळी लाभ घेतला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर मुने यांनी केले. तर आभार राहुल मुंजेकर यांनी मानले.
विजयबाबुंचं कौतुक करावं तितकं कमीच आहे - दिनकरराव पावडे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 20, 2024
Rating: