अवैध दारु बंद करणाऱ्या रणरागिणीचा वणीत सत्कार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : मारेगाव पोलीस स्टेशन च्या हद्दीत येत असलेल्या पंचक्रोशीत प्रसिध्द असलेल्या जाणामाय, कासामाय, मंदिर परिसरात गेल्या अनेक दिवसा पासुन अवैध दारुची विक्री जोमात सुरु होती. 

येथील अवैध दारु व्यवसाय बंद करण्यात यावा अशी मागणी भाविकांच्या वतीने वारवार करण्यात येत होती.मात्र या मागणी कडे प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळे मनसेच्या रणरागिणी कडुन येथील अवैध दारु केंद्र पेटवुन उध्वस्त करण्यात आले होते. अवैध दारु दुकान कायमचे बंद करणाऱ्या मनसेच्या रणरागिणीचा मनसेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजुभाऊ उंबरकर यांनी वणी येथील शिवमुद्रा या त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात सत्कार केला आहे. 

यापुढेही ग्रामीण भागात अवैध दारु व्यवसाय सुरु असल्यास मनसे स्टाईलने त्यांना धडा शिकवून दारु व्यवसाय बंद करावे असे आवाहन त्यांनी सत्कार करताना केले आहे. या कारवाईमुळे दारु विक्रीत्याचे धाबे दणाणले असुन पोलीस प्रशासनही अलर्ट झाले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाध्यक्ष अर्चना बोदाडकर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे, मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या मालेगाव तालुका अध्यक्ष उज्वला चंदनखेडे, मनसे वणी शहराध्यक्ष शिवराज पेचे, मारेगाव शहर संघटक नवी शेख, विभाग अध्यक्ष रोशन शिंदे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अवैध दारु बंद करणाऱ्या रणरागिणीचा वणीत सत्कार अवैध दारु बंद करणाऱ्या रणरागिणीचा वणीत सत्कार Reviewed by सह्याद्री चौफेर on September 20, 2024 Rating: 5
Powered by Blogger.