सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नेहमीच अतिवृष्टी असो की नैसर्गिक आपत्ती नुकसान असो. सतत काहींना काही शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय. अशातच मारेगाव तालुक्यात करपा रोग (एलीयट बाईट) या रोगाने सोयाबीन पिकांवर आक्रमन केल्याने नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी २५ हजार रुपयांचे अनुदान देण्याची मागणी उपसरपंच सचिन पचारे यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना केली आहे.
यासंबंधी आज शुक्रवारी (ता.२०) तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, शेतात मोठ्या प्रमाणात सोयाबीन चा पेरा आहे. त्याचप्रमाणे सोयाबीन पिकावरील करपा रोग (एलीयट बाईट) नावाचा रोग आला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे नुकसान झाले आहे. परिणामी हेक्टरी २५,०००/- ची मदत तत्काळ मिळावी अशी, मागणी कोसारा ग्रामपंचायतचे उपसरपंच सचिन पचारे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.
अशा नाजूक परिस्थितीत शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी फोडण्यासाठी ताबडतोब हेक्टरी २५ हजार रुपयांची सरसकट नुकसान भरपाई द्यावी. अशी आग्रही मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
निवेदनावर उपसरपंच सचिन पचारे, भाऊराव गाणार, प्रकाश खडसे,महादेव वनकर, मंगल गाणार, संतोष बगडे, अंबादास देवतळे, कवडू पाटील, ऋषिकेश कुत्तरमारे, नागेश्वर पचारे, राजू गाणार, खेमराज गाणार, धनराज खडसे, गिरीष चौधरी, नामदेव पचारे, प्रविण कुत्तरमारे, दशरथ येडमे, मुरलीधर येडमे, राजु येरेकर, बबन येडमे,आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
एलीयट बाईट रोगाने सोयाबीनचे अतोनात नुकसान
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 20, 2024
Rating: