सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
वणी : चारगाव चौकी ते ढाकोरी (बोरी) राज्यमार्ग हा अतिशय वर्दळीचा असून या रस्तावर चारगाव चौकी ते आबई फाटा आणि ढाकोरी (बोरी) या दरम्यान १०० फुट रस्ता परिसरात २ ते २.५ फूट जागो-जागी खड्डे पडले होते. यासंबधी युवा मोर्चाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष वैभव कवरासे यांनी दिनांक 9 सप्टेंबर रोजी संबंधित विभागाला निवेदन सादर केले होते, त्यांच्या मागणीला यश आले असून सदर रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली.
वणी तालुक्यातील २५ गावातील शेतकरी शेतमजूर वापर, सोबतच चंद्रपूर जिल्हा व तेलंगाणाराज्याकडे जाणारे प्रवासी, वणी बाजार पेठ, शिरपूर प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलीस स्टेशन या ठिकाणी उपचारा साठी गरोदर माता, जेष्ठ नागरिक, लहान बालके, यांना प्रवास करताना प्रचंड नाहक त्रास सहन करावा लागत होता. परिणामी हाडाचे, पोटाचे, आजार असणाऱ्या प्रवाश्यांच्या आजारपणात खर्चात वाढ झाली, अशी या मार्गांवर प्रवास करणाऱ्यांची तक्रार होत होती. सदर या रस्त्यावरून कोळसा, सिमेंट, गिट्टी डोलोमाइन्स यांची वाहतूक करणारी अवजड वाहने व दुचाकी ऑटो यांना तारेवरची कसरत करीत लागत होती. तसेच बेरोजगार युवकांनी रोजगारासाठी घेतलेले ऑटो, छोटा हत्ती, मेट्याडोअर याचा रस्ता नादुरुस्तीमुळे दुरुस्ती खर्च वाढून बँक कर्ज भरणे कठीण झाले. "खड्यात रस्ते कि, रस्त्यात खड्डा" अशी जागोजागी मृत्यूकुंड निर्माण झालेल्या या रस्त्यावरून प्रवास सुरु होता. हा रस्ता सुरळीत व्हावा अशी मागणी वैभव कवरासे यांच्या गावकरी व प्रवाशी यांची आग्रही मागणी होती,आता या मागणीला यश आले असून या भागातील प्रवाश्यांची दुचाकी, बैलगाडी ट्रॅक्टर, ऑटो प्रवास करताना मार्ग सुकर होणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने मागणी असलेल्या रस्त्यावरील खड्डे बुजावण्याचे सुरू झालेले असून आणि काही दिवसात रस्ता वाहतुकीसाठी योग्य राहील जेणेकरून त्रास होणार नाही अशी लेखी पत्र प्राप्त झाल्याने या मार्गांवरील प्रवाशांचा मार्ग सुकर होणार नाही. असं बोलल्या जात असून चारगाव चौकी ते ढाकोरी (बोरी), या रस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे माजी जिल्हा उपाध्यक्ष वैभव कवरासे यांच्या ग्रामस्थ व प्रवाश्यानी तूर्तास समाधान व्यक्त केले आहे.
वैभव कवरासे यांच्या मागणीला यश: चारगाव चौकी ते ढाकोरी (बोरी) राज्य मार्ग होणार सुकर
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 21, 2024
Rating: