वीज पडून मृत्यू झालेल्या महिलेचा वारसांना शासनाकडून 4 लाखांची मदत


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : तालुक्यातील गोरज येथील एका महिलेच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना 30 ऑगस्ट रोजी घडली होती. दरम्यान, मयत महिलेच्या वारसांना शासनाकडून नुकतीच 4 लाख रुपयांची मदत करण्यात आली. आ.संजीवरेड्डी बोदकूरवार यांच्या हस्ते रक्कमेचा धनादेश कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला.

गोरज (ता. मारेगाव) येथील निर्मला श्रीकृष्ण आत्राम यांचा दि.30 ऑगस्ट रोजी अंगावर वीज पडून मृत्यू झाला होता. दरम्यान, झालेल्या घटनेचा तत्काळ पंचनामा करून शेतकऱ्याच्या वारसास शासनाकडून तत्काळ मदत मिळावी, अशा सूचना आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, वैद्यकीय अधिकारी यांना दिल्या होत्या. जिल्हा प्रशासनानेही या घटनेची तत्काळ दखल घेत आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शासनाकडून 4 लाख रुपयाची मदत मयत महिलेच्या पती श्रीकृष्ण गणपत आत्राम रा. गोरज यांना करण्यात आली. आ.बोदकूरवार यांच्या हस्ते रक्कमेचा धनादेश कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आला. 

याप्रसंगी तहसीलदार ऊत्तम निलावाड, भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, ता. सरचिटणीस प्रशांत नांदे, भाजपाचे अनुप महाकुलकर, पोलीस पाटील प्रमोद ताजने यांसह मंडळ अधिकारी, तलाठी, महसूल सहाय्यक आदी उपस्थित होते.

आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांनाही शासनाची मदत :
तसेच 2023 मागील वर्षी कोलगाव येथील शालिक उर्फ प्रदिप नानाजी अवताडे यांनी दिनांक 22/12/2023 रोजी विष प्राशन करून आत्महत्या केली. आणि ईश्वर मारोती ढोके (वय अंदाजे 33) रा. शिवणी धोबे यांनी दिनांक 17/12/2023 रोजी विष प्राशन करुन आत्महत्या केली होती. आत्महत्येच्या सात्वनपर धनादेश रुपये दोनही कुटुंबातील वारसाना एक एक (1,00,000)  लाख रुपयाची मदत आज रोजी दिनांक 21/09/ 2024 रोजी तहसील कार्यालयात वितरण करण्यात आली.
दरम्यान,लाभ स्वीकारलेल्या कुटुंबातील सदस्यांनी भावुक होऊन शासन प्रशासनाचे आभार मानले. यावेळी वणी विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी केंद्र व राज्याचे सरकार जनतेच्या व विशेषतः शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. 
वीज पडून मृत्यू झालेल्या महिलेचा वारसांना शासनाकडून 4 लाखांची मदत वीज पडून मृत्यू झालेल्या महिलेचा वारसांना शासनाकडून 4 लाखांची मदत Reviewed by सह्याद्री चौफेर on September 21, 2024 Rating: 5
Powered by Blogger.