वणी येथे मोफत भव्य आरोग्य सर्वरोग निदान शिबीराचे उद्या आयोजन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : सेवा पंढरवाडा अंतर्गत भारतीय जनता पार्टी वणी विधानसभा व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने निशुल्क भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन उद्या रविवार दिनांक 22 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी ठीक 10 ते 3 वाजता येथील लॉयन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल, नांदेपेरा रोड वणी येथे आयोजित केले आहे. 

मेडिसीन तज्ञ, नेत्ररोग तज्ञ, सर्जरी तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नाक कान घसा तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, श्वसनरोग तज्ञ, असे विविध तज्ञाच्या माध्यमातून सर्व रोगनिदान करण्यात येणार आहे. भारतीय जनता पार्टी व सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त पुढाराकातून उद्या रविवारी निशुल्क भव्य आरोग्य शिबिरात सहभागी होऊन लाभ घ्यावा अशी प्रसिद्धी पत्रकातून माहिती देण्यात आली.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याच्या समस्या दिवसागणिक वाढत आहे. वणी विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्या सुबक कल्पनेतून आरोग्य सुदृढीसाठी विशेष करून निशुल्क भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यात निशुल्क सर्व रोगनिदान व उपचार केल्या जाणार आहेत. तसेच भरती रुग्णांना हॉस्पिटल जाण्याकरिता वाहणांची व्यवस्थाखाट, जेवण सर्व मोफत आहे. 

त्यामुळे वणी शहरातील सर्व नागरिकांनी शिबीर स्थळी येऊन सर्व रोगनिदान व उपचाराचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले आहे.
वणी येथे मोफत भव्य आरोग्य सर्वरोग निदान शिबीराचे उद्या आयोजन वणी येथे मोफत भव्य आरोग्य सर्वरोग निदान शिबीराचे उद्या आयोजन Reviewed by सह्याद्री चौफेर on September 21, 2024 Rating: 5
Powered by Blogger.