खासदार धानोरकर यांना सकल नाभिक समाजाचे निवेदन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : येथील वसंत जिनिंग कार्यलयात २४ सप्टेंबर रोज मंगळवार ला दुपारी 3 वा. 'जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदार संघाच्या खासदार श्रीमती प्रतिभा धानोरकर ह्यांची प्रमुख उपस्थिती होती. 
यावेळी नाभिक युवा क्रांती बहुउद्देशीय संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने मारेगाव तालुक्यातील सकल नाभिक समाजाच्या नेतृत्वात दि.30 सप्टेंबर 2024 रोजी होणाऱ्या आजाद मैदान आंदोलनाबाबत चर्चा करून खा. धानोरकर यांना निवेदन देण्यात आले. 
निवेदन देताना नाभिक युवा क्रांतीचे उपाध्यक्ष निरंजन येसेकार, कोषाध्यक्ष मनोज चौधरी, सेनाप्रमुख भाऊ वाटेकर, विनोद आंबेकर, तुळशीदास वाटेकर व मारेगाव ता.नाभिक असोसिएशनचे अध्यक्ष आनंद नक्षीने, गजू नक्षीने आदींची  उपस्थिती होती.
खासदार धानोरकर यांना सकल नाभिक समाजाचे निवेदन  खासदार धानोरकर यांना सकल नाभिक समाजाचे निवेदन Reviewed by सह्याद्री चौफेर on September 25, 2024 Rating: 5
Powered by Blogger.