सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
यवतमाळ : कोतवाल संवर्गास चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवार, दि. २४ सप्टेंबरला राज्य कोतवाल संघटनेमार्फत धरणे आंदोलन करण्यात आले. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना देण्यात आले.
राज्य कोतवाल संघटनेचे राज्य स्तरीय लक्षवेधी आंदोलन मंत्रालयस्तरावरील कोतवाल संवर्गास चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात यावे, यासह विविध मागण्या सोमवार, दि. २३ सप्टेंबरपर्यंत पूर्ण न झाल्याने दि. २४ सप्टेंबरला राज्यभर जिल्हास्तरीय धरणे आंदोलन करण्यात आले. या भरपावसात सुरू असलेल्या आंदोलनात शेकडो कोतवाल सहभागी झाले होते. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना देण्यात आले.
यावेळी कोतवाल संघटनेचे राज्य उपाध्यक्ष योगेश शेडमाके, जिल्हाध्यक्ष उत्तम पाचभाई, उपाध्यक्ष पंकज जाधव, सचिव प्रशांत प्रभाते, महिलाध्यक्षा छाया दरोडे यांच्यासह दिलीप इंगोले, देवानंद फोपसे, अतुल अहिरे, अमोल लोंढे, किरण मोरे, राकेश संकिलवार, शंकर चव्हाण, रोशन जोगे यांच्यासह यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष आणि शेकडो कोतवाल कर्मचारी उपस्थित होते.
आजपासून कामबंद आंदोलन करणारकोतवाल संघटनेच्यावतीने बुधवार, दि. २५ सप्टेंबरपासून राज्यभर कामबंद आंदोलन करण्यात येणार असून गुरूवार, दि. २६ सप्टेंबरपासून मुंबई आझाद मैदान मागण्यापूर्ण होईपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या धरणे आंदोलनात यवतमाळ जिल्ह्यातील कोतवाल संघटना सहभागी होणार आहे.-उत्तम पाचभाईजिल्हाध्यक्ष, कोतवाल संघटना
-
चतुर्थ श्रेणीच्या मागणी साठी भर पावसात कोतवाल संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
September 24, 2024
Rating: