जीवन एक संघर्ष - किशोर चलाख

 जीवन एक संघर्ष 

सूर जणू सप्तरंगी
असे आपुले जीवन
मज नाही हे कळले
कसा गेलो मी गुंतून

वाटा या वळणदार
सुख दुःख सोबतीला
जावे चालत एकटं
कोणी नसे मदतीला

जरी संकटे आलीच
तरी सुखच वेचावे
दुःख ठेवुन बाजूला
मागे फिरून पहावे

उडी मारून सुखाची
प्रेम आपण घेऊया
देऊ सोडून नैराश्य
दुःख सारे विसरुया

असे जीवन संघर्ष
गात हसत जगावे
वैर सोडून देऊन
सदा प्रेम उधळावे

-किशोर बळीराम चलाख
मु.पो.गोंडपिपरी ता. गोंडपिपरी जि. चंद्रपूर 
भ्रमणध्वनी क्र.9405900987
ईमेल- kchalakh@gmail.com
जीवन एक संघर्ष - किशोर चलाख जीवन एक संघर्ष - किशोर चलाख Reviewed by सह्याद्री चौफेर on September 22, 2024 Rating: 5
Powered by Blogger.