संजय खाडे यांचे रस्त्यासाठी अनोखे आंदोलन

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : अवजड वाहतुकीमुळे तालुक्यातील अनेक रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना ये-जा करण्यात मोठा नाहक त्रास सहन करावा लागतो. रस्त्यावरील खड्ड्‌यांमुळे छोटे मोठे अपघात देखील होत आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संजय खाडे यांनी शुक्रवारी दिनांक 20 सप्टेंबर रोजी दुपारी भालर रोडवर कार्यकर्त्यांसह आंदोलन करण्यात आले. रस्त्यावरील खड्‌यात बेशरमाचे झाड लावून त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध केला. याबाबत त्यांनी निवेदन देत तालुक्यातील रस्ते तत्काळ दुरुस्त करावे, अशी मागणी त्यांनी केली. या आंदोलनात अशोक चिकटे, अरुण चटप, प्रमोद लोणारे, रवि कोटावार, तेजराज बोढे, विकेश पानघाटे, प्रफुल्ल उपरे, कुचनकर, कैलास पचारे, कल्पना मुने, राजाभाऊ पाथ्रडकर, पुरुषोत्तम आवारी, अशोक नागभिडकर वंदना आवारी, काजल शेख, मंदा भांगरे, संगिता खाडे, सविता रासेकर, सुपेखा वडिचार, कल्पना मुने, कमल लोणारे, सुशिला कांबळे, अशोक पांडे, अरुण मगराळे, संदीप कांबळे, संदीप ढेंगळे यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते व परिसरातील गावकरी सहभागी झाले होते.
संजय खाडे यांचे रस्त्यासाठी अनोखे आंदोलन संजय खाडे यांचे रस्त्यासाठी अनोखे आंदोलन Reviewed by सह्याद्री चौफेर on September 23, 2024 Rating: 5
Powered by Blogger.