आर्णी-केळापूर विधानसभा मतदारसंघातील जनतेची मागणी पूर्ण होणार

सह्याद्री चौफेर | रवि वल्लमवार 

पांढरकवडा : आर्णी-केळापूर विधानसभा मतदार संघात निवडणूकीचे वारे जोरात वाहत असून सत्तरूढ़ भाजपाने अजुन पावेतो उमेदवारी घोषित किंवा उमेदवाराचे संकेतही न दिल्यामुळे पांढरकवडा व घाटंजी तालूक्यातील स्थानीक स्वराज्य संस्थांच्या विविध आजी माजी पदाधिकाऱ्यांनी एकत्र येवून एक बैठक घेतली.भाजपाचे जेष्ठ नेते पांढरकवडा गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष व माॅ.जगदंबा पतसंस्थेचे उपाध्यक्ष श्री.काशिनाथजी मिलमिले यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली,या सभेत स्थानिक उमेदवारालाच उमेदवारी देण्यात यावी याकरीता चार नावे भाजपा पक्ष श्रेष्ठीकडे पाठविण्यात यावे असे ठरले.यातूनच भविष्याचा उमेदवार निश्चित होणार असल्याचा विश्वास आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, १६८० मध्ये हा मतदार संघ अनुसुचित जमाती करीता आरक्षित झाला.केवळ एक पंचावार्षिक वगळता इतर सर्व दशके या मतदार संघाबाहेरील उमेदवाराला प्रतिनिधीत्व मिळाल्याचे दिसून येते. त्यामुळे आदिवासी मतदार संघ असून सुध्दा गेल्या ४५ वर्षात या मतदार संघाचा विकास होवू शकला नाही,उलट मागासलेपणा वाढतच गेला.कॉंग्रेसने देखिल आत्ता पर्यंत मतदार संघा बाहेरील उमेदवार दिला,त्यामुळे सातत्याने मतदार संघाचा खरा स्थानिक आदिवासी डावलला गेला.त्यामुळे सत्तारूढ भाजपा मध्ये सुध्दा स्थानिक उमेदवाराच्या मागणीचा जोर वाढला आहे.व जनतेची आग्रही भुमीका सुध्दा दिसून येते.अशा परिस्थितीत अनेक जण ईच्छूक असले तरी पांढरकवडा व घाटंजी तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपाचे जिल्हा महामंत्री व पांढरकवडा पंचायत समितीचे माजी सभापती रितेश परचाके व सामाजिक कार्यकर्ते संजय आत्राम व माजी गटशिक्षणाधिकारी पांडूरंगजी कुमरे व महंत श्री.दत्त भारती विद्यालय आर्णिचे मुख्याध्यापक अमोल मंगाम यांची नावे सर्व संमतीने ठरवून यापैकी कोणालीही उमेदवारी दयावी अशी मागणी भाजपा पक्ष श्रेष्ठीकडे करण्यात आली.तसेच श्रेष्ठीचा निर्णय अंतीम मानण्यात येईल असे सुध्दा ठरविण्यात आले.निवडणूकीतील ईतर सर्व विषया सोबतच या मतदार संघात स्थानिक उमेदवार हा मुद्या महत्वाचा ठरत आहे.त्यामुळे या बैठकीत ठरविलेल्या नावांना विशेष महत्व प्राप्त झाले आहे.यावेळी जगदंबा पतसंस्थेचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती,तथा माजी कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती गजानन बेजंकीवार यांनी सभेला मार्गदर्शन केले व उपस्थितांचे आभार मानले.यासभेला प्रामुख्याने गजानन बेजंकीवार यांचेसह घाटंजी बाजार समितीचे अध्यक्ष नितिन कोठारी, उपसभापती घाटंजी बाजार समिती सचिनभाऊ पारवेकर, आबासाहेब पारवेकर जिर्नीगचे अध्यक्ष संभारेडडी येल्टीवार,माजी उपसभापती प्रकाश पाटील डंभारे,पारवा विविध का.स.सोसायटीचे माजी अध्यक्ष पोचारेड्डी,नगर परिषद घाटंजीचे गट नेते माजी भाजपा तालूका अध्यक्ष तथा न.प.माजी सभापती सतिष मलकापूरे,व्यापारी आघाडी व घाटंजी बाजार समितीचे माजी संचालक भरत पोतराजे,पांढरकवडा बाजार समितीचे माजी संचालक दिलीप अंगलवार,घाटंजी तालूका कारागीर सहकारी संस्थेचे अध्यक्ष तथा घाटंजी बाजार समितीचे संचालक प्रकाश खरतडे,खरेदी विक्री संघाचे माजी संचालक महेश बोळकुंटवार,माजी शिक्षण सभापती घाटंजी न.प.प्रशांत उगले,जेष्ठ सामाजीक कार्यकर्ते अंकुश ठाकरे,माजी अध्यक्ष पहापळ सोसायटी तथा पांढरकवडा खरेदी विक्री संचालक निलेश ठाकरे,माजी उपसंरपंच आकोली महेश चिंतावार,जिनिंग प्रेसिंगचे संचालक नरेंद्र बनपेल्लीवार,सहकारी संथा बेलोरीचे माजी अध्यक्ष गिरिधर पावडे,माँ.जगदंबा पतसंस्थेचे सचिव तथा उपसरपंच पहापळ रमेश भुरे ईत्यादि उपस्थित होते.
आर्णी-केळापूर विधानसभा मतदारसंघातील जनतेची मागणी पूर्ण होणार आर्णी-केळापूर विधानसभा मतदारसंघातील जनतेची मागणी पूर्ण होणार Reviewed by सह्याद्री चौफेर on September 23, 2024 Rating: 5
Powered by Blogger.